Crop Insurance  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी पीकविम्यापासून वंचित

Crop Damage Compensation : फळपीक विमा भरून देखील शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे गेल्यावर्षी पावसाळ्यात उपळाई बुद्रूक (ता. माढा) या गावात फळबागांचे अतोनात नुकसान झाले असतानाही, शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावे लागले आहे.

Team Agrowon

फळपीक विमा भरून देखील शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे गेल्यावर्षी पावसाळ्यात उपळाई बुद्रूक (ता. माढा) या गावात फळबागांचे अतोनात नुकसान झाले असतानाही, शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावे लागले आहे. तरी शासनाने त्रुटींची पडताळणी करून पीकविमा मिळावा, या मागणीचे पत्र उपळाई बुद्रूक येथील शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांना दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उपळाई बुद्रूक या गावाचे मंडळ कार्यालय हे माढ्यात असून, हवामान खात्याचे पर्जन्यमापक देखील या कार्यालयातच आहे. त्यामुळे उपळाई बुद्रूक भागात पाऊस झाला तरी याची नोंद होत नसून, याचा फटका पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना बसत आहे.

गेल्यावर्षी पावसाळ्यात शेतकऱ्यांनी खरीप २०२२ च्या मृगबहारमध्ये सीताफळ, लिंबू, डाळिंब या फळपिकांचा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत प्रधानमंत्री फळ पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा उतरविला होता.

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसात या भागातील शेतकऱ्यांच्या फळांचे मोठे नुकसान झाले. परंतु, माढा भागात त्या कालावधीत पाऊस न झाल्याने, उपळाई भागातील पावसाची नोंदच झाली नाही.

परिणामी शासनाच्या या चुकीच्या धोरणामुळे नुकसानग्रस्त शेतकरी पीक विम्यापासून वंचित असून, शासनाने पीक विम्याचे दावे तातडीने मंजूर करावेत, असे म्हटले आहे. निवेदन देताना शेतकरी भारत जाधव, भिवा बेडगे, सुधीर गायकवाड, अण्णासाहेब गावडे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change Conference : विकसित राष्ट्रांना ३०० अब्ज डॉलर्स मिळणार

Cotton Market : वरोरा भागात कापसाला ७१५० रुपयांचा दर

PESA : ‘पेसा’ क्षेत्राच्या पुनर्रचनेचा मार्ग मोकळा

Leopard Terror : बिबट्याच्या दहशतीमुळे अखंडित वीजपुरवठ्याची मागणी

Wheat Sowing : थंडीमुळे गव्हाची पेरणी वेगात

SCROLL FOR NEXT