Onion Rate  Agrowon
ताज्या बातम्या

Onion Rate : कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आक्रमक

लेट खरीप रांगडा लाल कांद्याचे दरात सातत्याने घसरत आहेत. त्यामुळे एकीकडे उत्पादकता कमी तर दुसरीकडे केलेला उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी वाढली आहे.

Team Agrowon

Onion Market Update नाशिक ः लेट खरीप रांगडा लाल कांद्याचे दरात (Onion Rate) सातत्याने घसरत आहेत. त्यामुळे एकीकडे उत्पादकता (Onion Productivity) कमी तर दुसरीकडे केलेला उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी वाढली आहे.

त्यामुळे जिल्ह्यात शेतकरी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करत आहेत. यापूर्वी चांदवड, मनमाड येथे रास्ता रोको आंदोलन झाल्यानंतर आता येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांद्याला भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले.

कांद्याच्या दरात होत असलेल्या घसरणीमुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर कांद्याचे बाजार भाव कोसळल्यामुळे तसेच निर्यात शुल्क कमी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.

सकाळी सुरुवातीला या कार्यकर्त्यांनी लिलाव बंद पाडले होते. यानंतर सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

या आहेत मागण्या :

१ जानेवारी २०२३ पासून विकलेल्या कांद्याला १००० रुपये प्रति क्विंटल अनुदान राज्य व केंद्र सरकारने जाहीर करावे. ‘नाफेड’मार्फत कांदा खरेदी सुरू करावी, कांद्याचे निर्यात शुल्क शून्य करून निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, कांद्याला हमीभाव द्यावा, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाची दखल घेतली नाही तर पुढच्या वेळेस तीव्र स्वरूपात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारादेखील आंदोलकांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT