Nashik DCC Bank Agrowon
ताज्या बातम्या

Nashik DCC Bank : नाशिक जिल्हा बँकेचा प्रश्न छगन भुजबळांनी तरी सोडवावा ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

Farmer Protest : नाशिक जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेकडून होणाऱ्या जप्ती आणि लिलावाच्या कारवाईला स्थगिती मिळावी, सातबारावरील बँकेने केलेल्या वसुलीसंदर्भातील फेरफार रद्द करण्यात यावेत, शेतकऱ्यांनी भरलेल्या कर्जावरील बेहिशेबी व्याज परत मिळावे यांसह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरू झाले.

Team Agrowon

Nashik District Central Cooperative Bank News: नाशिक : जिल्हा बँकेचा प्रश्न मार्गी लावण्यात पालकमंत्री दादा भुसे व सहकार मंत्री अतुल सावे हे अयशस्वी झाले. शेतकऱ्यांचा त्यांनी भ्रमनिरास केला. आता नवीन मंत्री झालेले जिल्ह्याचे नेते छगन भुजबळ यांनी हा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी व्यक्त केली.

गेल्या ४० दिवसांपासून नाशिक जिल्हा बँकेच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलक शेतकऱ्यांची भेट संदीप जगताप व ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील यांनी घेतली.

जिल्ह्यातील ६२ हजार शेतकऱ्यांच्या जाचक कर्ज वसुलीच्या विरोधात अनेक वेळेस आंदोलने झालीत. पालकमंत्री भुसे यांच्या घरावर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी मोर्चा केला. या बिऱ्हाड मोर्चात नवीन ओटीएस योजना देण्याचे आश्वासन सहकार मंत्री अतुल सावे व पालकमंत्री भुसे यांनी दिले होते. परंतु या घटनेला सहा महिने उलटून गेले तरी सरकारने यावर ठोस उपाययोजना केली नाही.

शेतीकामे सोडून उपोषणाची वेळ

राजू शेट्टी व ‘स्वाभिमानी’च्या शिष्टमंडळाने अनेकदा मुख्यमंत्र्यांना भेटून त्याची वारंवार आठवण करून दिली. प्रत्येक वेळेस हा प्रश्न मार्गी लावू, असा शब्द सरकारने दिला. पण तो पाळला नाही. यामध्ये पालकमंत्री म्हणून भुसे व सहकारमंत्री म्हणून अतुल सावे अयशस्वी झाले. त्यामुळे गेली ४० दिवस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीकामे सोडून उपोषण आंदोलनाला बसण्याची वेळ आली. म्हणून आता मंत्री भुजबळ यांनी हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे. याप्रसंगी शेतकरी संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष व आंदोलक भगवान बोराडे, सागर गवळी उपस्थित होते.

या पूर्वीच्या अनेक आंदोलनांमध्ये शेतकऱ्यांना आश्वासने देऊनदेखील सरकारने ती पाळली नाहीत. म्हणून सरकारची प्रतिमा जिल्ह्यात मलीन झाली आहे. ही प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी छगन भुजबळ यांनी मार्ग काढावा. जिल्ह्यातील ६२ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे.
संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT