Crop Insurance  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : पीकविमा भरपाईसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

गेल्या तीन वर्षांपासून सेनगाव तालुक्यातील गोरेगाव व परिसरात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र पीकविमा कंपन्या संबंधित शेतकऱ्यांना पीकविमा देण्यास तयार नाहीत.

Team Agrowon

कनेरगाव नाका, जि. हिंगोली : पीकविमा भरपाईसाठी (Crop Insurance Compensation) गोरेगाव (ता. सेनगाव) येथे सुरू असलेल्या शेतकरी उपोषणाला (Farmers Protest) पाठिंबा म्हणून गुरुवारी (ता.१९) भगवती येथील शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले.

गेल्या तीन वर्षांपासून सेनगाव तालुक्यातील गोरेगाव व परिसरात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मात्र पीकविमा कंपन्या संबंधित शेतकऱ्यांना पीकविमा देण्यास तयार नाहीत. २०२०-२१ चे एचडीएफसी ॲग्रो कंपनीचे १३.८९ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहेत. कृषी अधिकाऱ्यांनी संबंधित कंपनींना आदेश देऊन पंधरा दिवसांत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळती केली जाईल. रक्कम वळती झाली नाही तर संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असे लेखी आश्‍वासन दिले होते.

परंतु अद्यापपर्यंतही ना रक्कम मिळाली ना गुन्हे दाखल झाले. त्यामुळे बुधवार (ता. १८)पासून गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयासमोर नामदेव पतंगे, गजानन कावरखे, रावसाहेब अडकिने, ऋषिकेश बर्वे, बापूराव गरड यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदस्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

या उपोषणाला पाठिंबा म्हणून गुरुवारी (ता. १९) भगवती येथील शेतकऱ्यांनी पैनगंगा नदीमध्ये जलसमाधी आंदोलन केले. दरम्यान, तालुका कृषी अधिकाऱ्यांनी संबंधितांना लेखी आश्‍वासन देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Fruit Market: उन्हाळी हंगामात फळे तेजीत

Education Reform: शिक्षणात सुधारणा ही सामूहिक जबाबदारी

Ethanol Fuel: इथेनॉल ठरेल पर्यायी इंधन

Namo Shetkari Mahasamman Yojana: ‘नमो’चा आठवा हप्ता पुढील आठवड्यात

Pune ZP: पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वीरधवल जगदाळे

SCROLL FOR NEXT