Agriculture Processing  Agrowon
ताज्या बातम्या

Processing Industry : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी प्रक्रिया उद्योगाकडे वळावे

कोणत्याही मालावर प्रक्रिया केल्यास अधिकचा पैसा मिळून परिसरात रोजगार निर्मिती करता येतो.

Team Agrowon

Agriculture Processing Industry बदनापूर, जि. जालना : मराठवाड्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांनी मोसंबी प्रक्रिया उद्योग (Mosambi Processing Industry) उभारून ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार (Employment) मिळवून देऊन आपली आर्थिक उन्नती साधावी, असा सल्ला मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ संजय पाटील यांनी दिला.

मोसंबी संशोधन केंद्र आणि ‘आत्मा’ यांच्यातर्फे स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत ॲग्रोगोल्ड फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या सभासदांच्या मोसंबी केंद्रात आयोजित प्रशिक्षण वर्गात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर प्रगतिशील शेतकरी रामदास बारगजे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अरुण शिसोदे, सहायक व्यवस्थापक दिनेश पारडे आदींची उपस्थिती होती.

या वेळी अकोला, भरडखेडा, निकलक, भायगाव, वाकुळणी आदी गावांतील मोसंबी उत्पादक उपस्थित होते. या वेळी डॉ. पाटील म्हणाले, की मराठवाड्यात मोसंबी हे प्रमुख फळपीक असून, कच्चा माल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे.

कोणत्याही मालावर प्रक्रिया केल्यास अधिकचा पैसा मिळून परिसरात रोजगार निर्मिती करता येतो. मोसंबी फळपिकापासून जाम, जेली, मामलेड, स्कॉश, रस आदी पदार्थ बनविता येतात, असेही ते म्हणाले.

या वेळी अजीश शेख, संदीप केकान, संदीप वाघ, परमेश्‍वर शिंदे, राधाकिशन भाबड आदींची उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT