Farm Road Agrowon
ताज्या बातम्या

Farm Road : भोकरमधील शेतरस्ता २० दिवसांपासून चिखलात

Agriculture Road : भोकर-पळसोद-रामेश्वर (ता. जळगाव) हा तीन गावांना जोडणारा मार्ग मागील २० ते २२ दिवसांपासून चिखलामुळे बंदावस्थेत आहे. शेतकरी शेतात ट्रॅक्टर, दुचाकी घेऊन जाऊ शकत नाहीत.

Team Agrowon

Jalgaon News : भोकर-पळसोद-रामेश्वर (ता. जळगाव) हा तीन गावांना जोडणारा मार्ग मागील २० ते २२ दिवसांपासून चिखलामुळे बंदावस्थेत आहे. शेतकरी शेतात ट्रॅक्टर, दुचाकी घेऊन जाऊ शकत नाहीत. पायी जातानाही मोठा चिखल तुडवावा लागत आहे.

भोकर व परिसरत तापी नदीकाठी आहे. परिसरात काळी कसदार जमीन आहे. केळीची शेती अधिक असून, भोकरपासून साडेतीन किलोमीटर एवढा हा रस्ता आहे. पुढे तो पळसोद व रामेश्वर येथे जातो. हा रस्ता पूर्वी डांबरी होता. त्याची दैना झाली होती. त्याची दुरुस्ती, नूतनीकरण करण्यासंबंधी तो दोन्ही बाजूला जेसीबीच्या साह्याने खोदून माती रस्त्यावर माती टाकली आहे.

मुख्य रस्त्यावर मातीचा मोठा थर आला. त्याचा पावसामुळे पूर्ण चिखल झाला आहे. भोकर, आमोदे बुद्रुक, जामोद व पळसोद या गावांचा संपर्क आहे. या गावंचे मिळून सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्र या भागात आहे. त्यात केळी पीक अधिक आहे. या गावांची मिळून सुमारे १२ हजारांवर लोकसंख्या आहे.

या रस्त्याने पुढे रामेश्वर मंदिर येथे भक्त, ग्रामस्थ जातात. तेथे गिरणा-अंजनी व तापी नदीचा त्रिवेणी संगम आहे. पुरातन महादेव मंदिर आहे. यामुळे हा मार्ग सोईस्कर आहे. मोठी ये-जा या रस्त्यावरून सुरू असते. हा रस्ता तयार करताना एकाच बाजूने खोदायला हवा होता. परंतु तो दोन्ही बाजूने खोदून त्याची माती रस्त्यावर टाकण्यात आली.

त्यात सतत किंवा मागील २२ ते २३ दिवस पाऊस सुरू आहे. पावसामुळे त्यावर मोठा चिखल झाला. चिखलातून ट्रॅक्टर, दुचाकी जाऊ शकत नाहीत. अनेक शेतकऱ्यांच्या दुचाकी रस्त्यात मध्यंतरी अडकल्या होत्या.

रिमझिम पावसाने शेतात तणनिंत्रण व इतर कामे रखडली आहेत. पावसाळ्यात रस्त्यांचे नूतनीकरण, विकास कसा केला जातो, रस्ता तयार करायचा होता तर उन्हाळ्यात केला असता, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

Papaya Mealybug Infestation: पपईवरील पिठ्या ढेकणाची वाढती समस्या

Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत

FPC Success Story: महिला शेतकरी कंपनीची भरारी !

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

SCROLL FOR NEXT