Fake Pesticide
Fake Pesticide Agrowon
ताज्या बातम्या

Fake Pesticides : दिंडोरीत ६ लाखांची बनावट कीटकनाशके जप्त

टीम ॲग्रोवन

नाशिक : कृषी विभागाच्या भरारी पथकाला (Bharari Team of Agriculture Department) दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथील नंदिनी किचन अॅप्लिकेशन प्रा. ली. (Nandini Kitchen Application Pvt. Lee.) यांच्या आवारात बनावट कीटकनाशके व बुरशीनाशके विक्रीसाठी साठवणूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार जिल्हा भरारी पथकाने बुधवारी (ता. १२) छापा टाकला असता

येथे बुरशीनाशके व कीटकनाशके यांच्या गोण्या व बॉक्स आढळून आले. कारवाईत ६ लाखांचा माल जप्त करण्यात आला. कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने घटनास्थळी पंचासमक्ष पंचनामा करत संबंधित दीपक मोहन अग्रवाल व पुंजाराम हिरामण कोरडे यांच्याकडे चौकशी केली असता, या दोघांकडे कीटकनाशके व बुरशीनाशके विक्री करण्याचा परवाना नव्हता.

विनापरवाना, बेकायदा कीटकनाशके व बुरशीनाशके विक्री करण्यासाठी साठवणूक करीत असल्याचे आढळून आले. तसेच या साठ्याचे खरेदी बिलांची मागणी केली असता ती सादर करता आली नाहीत. तसेच वरील सर्व कीटकनाशकांवर केंद्रीय किटकनाशक नोंदणी क्रमांक, कीटकनाशक उत्पादन परवाना क्रमांक, कीटकनाशक विक्री परवाना क्रमांक छापलेला नसल्याचे दिसून आले.

बेकायदा कीटकनाशके व बुरशीनाशकांचा साठा विक्रीसाठी वितरणास जबाबदार दीपक मोहन अग्रवाल (वय ५२ वर्ष, रा. लालस्मृती, मखमलाबाद रोड, पंचवटी, नाशिक) यांच्याविरुद्ध विनापरवाना बेकायदा नियमबाह्य बोगस अधिसूचित किटकनाशकांचा साठा करून शेतकऱ्यांना विक्रीसाठी वितरण, कीटकनाशकांची नोंदणी न करणे, उगम प्रमाणपत्र नसणे, उत्पादन व विक्री परवाना नसल्यामुळे शासन व शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याने किटकनाशक कायदा १९६८,

कीटकनाशक नियम १९७१, पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अभिजित घुमरे यांनी दिंडोरी पोलिस ठाणे येथे फिर्याद नोंदविली. पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ तपास करीत आहेत. बनावट कीटकनाशकांचा २९५ किलो साठा जप्तकृषी विभागाने सापळा

रचून नाशिकचे विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या आदेशानुसार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, गुणनियंत्रण तंत्र अधिकारी संजय शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील यांच्या सहकार्याने जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अभिजित घुमरे यांनी ही कारवाई केली आहे.

जिल्हा भरारी पथकाने बनावट कीटकनाशकांचा सुमारे २९५ किलो साठा जप्त केला आहे. त्याचे बाजारमूल्य सुमारे ६.१६ लाख रुपये असल्याची माहिती आहे. कारवाईवेळी दिंडोरी पंचायत समितीचे कृषी अधिकारी दीपक साबळे उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

Jaljeevan Mission : रायगडमध्ये जलजीवनची निम्‍मी कामे अपूर्ण

Mango Market : उरणमध्ये आंब्यांची आवक वाढली

Water Scarcity : पाणीपुरवठा संस्थांचे शेतकरी पाणी टंचाईच्या कात्रीत

SCROLL FOR NEXT