Fake Pesticides  Agrowon
ताज्या बातम्या

Fake Pesticides : बनावट कीटकनाशके प्रकरणी दोन जणांवर गुन्हा

हैदराबादमध्ये बनवलेले बनावट कीटकनाशक, बुरशीनाशक यांची विक्रीसाठी साठा आणि विना परवाना वाहतूक करणाऱ्या दोघांवर कृषी विभागातील गुणनियंत्रणच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली.

Team Agrowon


ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली ः हैदराबादमध्ये बनवलेले बनावट कीटकनाशक (Fake Pesticides ) , बुरशीनाशक (Fungicide) यांची विक्रीसाठी साठा आणि विना परवाना वाहतूक करणाऱ्या दोघांवर कृषी विभागातील (Agriculture Department) गुणनियंत्रणच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. सुमारे १४ लाख ४३ हजार ८०० रुपयांची शेती औषधे जप्त केली आहेत. बजरंग भूपाल माळी, शशिकांत विलासराव थोरात यांच्यावर आष्टा येथील पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माहिती अशी, हैदराबाद येथे बनवलेली बनावट औषधे हैदराबाद येथून माधवनगर येथील ट्रान्सपोर्टच्या कार्यालयात आली. औषधे कीटकनाशके, बुरशीनाशके बागणी बावची रस्त्यावर चार चाकीतून विक्रीच्या हेतून आली होती. गाडीचे चालक शशिकांत विलासराव थोरात (रा. कोटभाग ता. वाळवा) तसेच बजरंग भूपाल माळी (साखराळे रोड, कोरे मळा, ता. वाळवा) यांना शेती औषधांचा साठा जप्त करून पंचनामा केला.

त्यानंतर स्कोअर, कर्झेट रिडोमील, क्रोबट, लनेट आदी मालाचे प्रत्येकी तीन नमुने सर्व पंचासमक्ष सील करून पुणे येथील कीटकनाशके तपासणी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. स्कोअर, कर्झेट रिडोमील, क्रोबट, लनेट याची सुमारे १४ लाख ४३ हजार ८०० किमतीची संशयित कीटकनाशके, बुरशीनाशके जप्त करण्यात आली आहेत.

बजरंग भूपाल माळी, शशिकांत विलासराव थोरात यांच्यावर आष्टा येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक सुरेंद्र पाटील, कृषी अधिकारी संजय बुवा यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Adulteration Racket: गोरखधंदा भेसळीचा!

Maharashtra Vanshree Award 2024: ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर

Early Banana Harvesting: आगाप कांदेबाग केळीची काढणी खानदेशात सुरू

Pandharpur ST Buses: आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५,५०० विशेष बसगाड्या

Coco Peat GST: बियाण्यांप्रमाणे कोकोपीटही जीएसटीमुक्त करण्यात यावे; राज्य भाजीपाला नर्सरी असोसिएशन

SCROLL FOR NEXT