Soybean Stock Limit : केंद्राने सोयाबीनवरील स्टाॅक लिमिट काढले

टीम ॲग्रोवन

देशातील बाजारात सोयाबीनची आवक सध्या वाढलेली आहे. तर दुसरीकडे सोयाबीनमधील ओलावा आता कमी येत आहे.

Soybean | Agrowon

आता केंद्र सरकारने खाद्यतेल आणि तेलबियांवरील स्टाॅक लिमिट काढले. त्यामुळे सोयाबीन बाजाराला आधार मिळेल, असे जाणकार सांगत आहेत.

Soybean | Agrowon

अनेक राज्यांनी त्याची अंमलबजावणी केली नव्हती. त्यामुळे केंद्राने लिमिट ठरवून ३० जून आणि नंतर ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत स्टाॅक लिमिट लावले होते.

Soybean | Agrowon

उद्योगांना सध्याच्या स्टाॅक लिमिटमध्ये काम करताना अडचणी येत होत्या. त्यातच सध्या देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत.

Soybean | Agrowon

स्टाॅक लिमिट काढल्याचा फायदा सोयाबीनला होऊ शकतो, असे शेतीमाल बाजार अभ्यासक सुरेश मंत्री यांनी सांगितले. सध्या देशातील बाजारांमध्ये सोयाबनची आवक वाढली आहे.

Soybean | Agrowon

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर मागील काही दिवसांमध्ये वाढले. मात्र देशातील सोयापेंडला निर्यातीसाठी कमी मागणी, स्टाॅक लिमिट आणि वायदेबंदीमुळे  देशातील दर त्याप्रमाणात वाढले नव्हते.

Soybean | Agrowon

आता केंद्र सरकारने खाद्यतेल आणि तेलबियांवरील स्टाॅक लिमिट काढले. त्यामुळे व्यापारी आणि संस्थांना तेलबिया आणि खाद्यतेलाचा साठा करता येईल.

Soybean | Agrowon

बऱ्याच बाजारांमध्ये सोयाबीनचे दर ५ हजार १०० रुपयांपर्यंत पोचले होते. बाजारात सध्या सोयाबीनची आवक जास्त असली तरी दर किमान ५ हजारांपर्यंत असू शकतात

Soybean | Agrowon

पुढील काही दिवस दरपातळी ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करावी, असे आवाहन जाणकारांनी केले आहे.

Soybean | Agrowon
cta image | Agrowon
येथे क्लिक करा