Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : पीकविमा नोंदणीला मुदतवाढ अशक्य

Crop Insurance Scheme : केंद्राचा हप्ता मिळण्यात तांत्रिक अडचणी

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Crop Insurance Registration : मुंबई : पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभाग घेण्यासाठी मुदत वाढविण्याची मागणी होत आहे. मात्र या मुदतीच्या पुढे नोंदणी केलेल्या पीकविम्यासाठी केंद्र सरकार हप्ता भरणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. परिणामी, मुदतवाढ मिळणे अशक्य आहे. तरीही कृषी विभागाने केंद्रीय कृषी विभागाशी संपर्क केला आहे. त्यासाठी ३१ जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

राज्यात आतापर्यंत १ कोटी ३५ लाख ५६ हजार १७२ शेतकऱ्यांनी पीकविमा नोंदणी केल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. गेल्या काही दिवसांत दररोज सहा ते सात लाख शेतकरी नोंदणी करत असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.

मात्र राज्यात जूनपासून सेतू केंद्रांमधील सर्व्हर अतिशय धीम्या गतीने सुरू असल्याने शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यास अडचण येत होती. त्यामुळे पीकविमा भरण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत आमदारांनी केली. मात्र कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यास नकार दिला आहे.
दरम्यान, आमदारांचा वाढता दबाव लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार यांची बैठक झाली. या वेळी अनुपकुमार यांना केंद्रीय कृषी विभागाच्या सचिवांशी संपर्क करून मुदतवाढीची मागणी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार अनुपकुमार यांनी संपर्क केला असता सध्या पीकविमा भरणाऱ्यांची संख्या पाहता ३१ जुलैपर्यंत १ कोटी ५० लाख शेतकरी पीक विमा भरतील, असा अंदाज आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी पीकविम्याच्या संरक्षणाखाली येतील, असा दावा केला जात आहे.

राज्य सरकार मुदतवाढीसाठी आग्रही
केंद्र सरकारने दिलेल्या मुदतीत पीकविमा भरल्यास केंद्राच्या वाट्याचा हप्ता भरण्यात येतो. तशा मार्गदर्शक सूचना आधीपासूनच दिल्या आहेत. त्यामुळे मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे. राज्य सरकार मुदतवाढीसाठी आग्रही असले तरी तांत्रिक अडचणीमुळे विम्यासाठी मुदत वाढविणे शक्य नसल्याचे कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पीकविमा घेतलेले शेतकरी : १,३५,५६,१७२
शनिवारी सकाळी नऊपर्यंत २४ तासांत झालेली नोंदणी : ७,२९,०८०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT