Pesticide Agrowon
ताज्या बातम्या

Pesticide : कीटकनाशके विक्रेत्यांच्या अभ्यासक्रमास मुदतवाढ

कीटकनाशके विक्रीसाठी पदविका प्रमाणपत्र धारण करणे केंद्रीय कृषी मंत्रालयाने बंधनकारक केले आहे.

Team Agrowon

Pesticide News पुणे ः कीटकनाशके विक्रीसाठी (Pesticide Sell) पदविका प्रमाणपत्र धारण करणे केंद्रीय कृषी मंत्रालयाने (Union Mistry Of Agriculture) बंधनकारक केले आहे.

मात्र, प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची मुदत समाप्त झाल्यामुळे राज्यातील हजारो विक्रेते अडचणीत आले होते. केंद्राने आता या अभ्यासक्रमाला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे.

प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करण्याची आधीची मुदत ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत होती. मात्र, देशातील किमान दीड लाख विक्रेत्यांना अभ्यासक्रम पूर्ण करता केलेला नाही.

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या पीक संरक्षण विभागाचे संयुक्त सचिव आशिष कुमार श्रीवास्तव यांनी जारी केलेल्या नव्या अधिसूचनेत आता ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.

अभ्यासक्रमाची आधीची मुदत समाप्त होऊन तीन महिने लोटले होते. प्रमाणपत्र नसल्यास कीटकनाशकांची विक्री बेकायदेशीर ठरत होती. त्यामुळे किमान एक वर्षाने मुदत वाढवून देण्याची मागणी देशातील विक्रेत्यांनी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे केली होती.

मुदतवाढ मिळेपर्यंत प्रमाणपत्र न बाळगल्याचा ठपका ठेवत विक्रेत्यांवर कारवाई करू नये, असाही आग्रह विक्रेत्यांनी धरला होता. केंद्रीय कृषी सचिव मनोज आहुजा यांनी या दोन्ही मुद्द्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे ही समस्या किमान या वर्षासाठी तरी मिटली आहे.

कीटकनाशकांची विक्री करण्यासाठी पदविका प्रमाणपत्र बाळगणे बंधनकारक आहे. मात्र, प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची मुदत संपली होती. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांना भेटून ही समस्या आम्ही निदर्शनास आणली. त्यांनी मंत्रालयाला सूचना दिल्याने विक्रेत्यांवर कारवाई टळलीच; पण आता अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढदेखील मिळाली आहे.

- मनमोहन कलंत्री, अध्यक्ष, अॅग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mobile Slaughterhouses : अरुणाचल सरकार देणार मोबाइल स्लॉटर हाउसला प्रोत्साहन

Climate Change : हवामान बदलावर विचारमंथन करणारी ‘कॉप’

Jaggery Production Kolhapur : गुळाला भाव मिळतोय पण आवक घटली; गूळ उत्पादनावर विधानसभा निवडणुकीचा परिणाम

Pomegranate Farming : यंदा दोन्ही बहरांचे नियोजन करतोय!

Agriculture Warehouse : शास्त्रशुद्ध पद्धतीने गोदाम उभारणी

SCROLL FOR NEXT