Grape Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Grape Crop Damage : लासलगावात निर्यातक्षम द्राक्ष बाग भुईसपाट

लासलगाव कोटमगाव रोडवरील श्री छत्रपती शिवाजी महाराज नवीन कांदा मार्केटजवळ शेतकरी प्रल्हाद कमलाकर पाटील यांचा दीड एकर द्राक्ष बाग आहे. त्यांचे सुमारे आठ ते दहा लाखांचे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Lasalgaon News : येथे दीड एकर सुपर सोनाका जातीची द्राक्षबाग (vineyard) गुरुवारी (ता. ३०) वावटळीने भुईसपाट (Grape Crop Damage) झाली आहे. लासलगाव कोटमगाव रोडवरील श्री छत्रपती शिवाजी महाराज नवीन कांदा मार्केटजवळ (Onion Market) शेतकरी प्रल्हाद कमलाकर पाटील यांचा दीड एकर द्राक्ष बाग आहे. त्यांचे सुमारे आठ ते दहा लाखांचे नुकसान झाले आहे.

दोन दिवसांपूर्वी व्यापारी बाग पाहून गेले होते. द्राक्ष रशिया येथे एक्स्पोर्ट होणार होते. बागेचा द्राक्ष व्यापाऱ्याशी ५१ रुपये प्रतिकिलोने सौदा झाला होता. परंतु, रामनवमीची सुट्टी असल्याने शुक्रवारपासून व्यापारी द्राक्षबाग काढणीला सुरुवात करणार होते.

अनेक संकटावर मात करत जगवलेली दोनशे क्विंटल द्राक्षबाग बाग अचानक आलेल्या वादळाने भुईसपाट झाली. द्राक्षाची निर्यात होणारच होती. तितक्यात वावटळीने पूर्ण बाग कोसळल्याने होत्याचे नव्हते झाले आहे.

अचानक आलेल्या वावटळीने भुईसपाट झालेला बाग उभे करण्याचा प्रयत्न केला. परंतु द्राक्षांचे वजन जास्त असल्याने बाग पुन्हा उभे करणे अशक्य झाले. निफाड तालुक्यात पंधरा दिवसांअगोदर आलेल्या पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

येथील शेतकरी प्रल्हाद पाटील यांच्या एसएसएन वाणाचा द्राक्षबाग काढणीच्या टप्प्यात असतानाच वावटळीच्या सापडल्याने नुकसान तडाख्यात झाले आहे. आता पूर्ण द्राक्षबाग कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे.

मोठ्या कष्टाने बाग वाढवली, फळ आता येण्याच्या मार्गावर असतानाच अस्मानी संकटांनी घाला घातला. यात संपूर्णतः द्राक्ष बाग उद्ध्वस्त झाल्याने पाटील यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT