Fertilizer Price Agrowon
ताज्या बातम्या

Fertilizer Cost : खत आणि कीटकनाशकवरील खर्च नियंत्रित करावा लागेल

वनामकृवि, परभणी कृषी विज्ञान केंद्र, औरंगाबाद-१ यांच्यावतीने नुकताच ८३ वा शेतकरी शास्त्रज्ञ मंच कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

Team Agrowon

Aurangabad News : शेतकऱ्यांना आपली शेती करत असताना शेती निविष्ठांवर होणार खर्च शेतकऱ्यांनी कमी करायला हवा. सध्याच्या काळात शेतीमध्ये उत्पन्न (Agriculture Income) जास्त मिळवण्यासाठी अमाप खतांचा (Fertilizer Use) व कीडनाशकाचा वापर केला जात आहे.

ज्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चामध्ये वाढ झाली आहे. हा खर्च आपल्याला कमी करावा लागेल व नैसर्गिक शेतीकडे वळावे लागेल, असे मत प्रगतिशील शेतकरी दीपक जोशी यांनी व्यक्त केले.

वनामकृवि, परभणी कृषी विज्ञान केंद्र (Parbhani Krishi Vigyan Kendra), औरंगाबाद-१ यांच्यावतीने नुकताच ८३ वा शेतकरी शास्त्रज्ञ मंच कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रगतिशील शेतकरी दीपक जोशी, केव्हीके कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे व विषय विशेषज्ञ कृषी हवामानशास्त्र प्रा अशोक निर्वळ यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमामध्ये नैसर्गिक शेती काळाची गरज या विषयावर बोलताना श्री. जोशी म्हणाले, की शेतीसाठी होणार खर्च नियंत्रित झाला तर शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होईल. नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून देत, शेतकरी तरुण वर्गाने गट शेतीला प्राधान्य द्यावे, असा सल्ला देखील त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला.

यावेळी डॉ. झाडे यांनी पौष्टिक तृणधान्याचे एकात्मिक पीक पद्धतीतील महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. तृणधान्याचे मानवी आहारातील महत्त्व सांगितले. शेती करत असताना शेतकरी बांधवांनी शाश्वत उत्पादनासाठी शेतीपूरक व्यवसायाकडे वळावे असा सल्ला देखील त्यांनी दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन व्ही. एस. पतंगे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

Turmeric Harvest Management: हळद काढणी पश्चात व्यवस्थापनावर मार्गदर्शन

Farmer Compensation Maharashtra : राज्यात २ लाख ४ हजार हेक्टर शेतीपिकांचं नुकसान; शेतकऱ्यांना लवकरात-लवकर मदत देणार, कृषिमंत्री भरणे यांची ग्वाही

Fertilizer Stock Approved: अकोला जिल्ह्यासाठी १.१४ लाख टन खत मंजूर

SCROLL FOR NEXT