Santosh Somvanshi
Santosh Somvanshi Agrowon
ताज्या बातम्या

APMC : बाजार समित्यांना मालमत्ता करातून सूट द्या ः सोमवंशी

टीम ॲग्रोवन

लातूर ः ‘‘राज्यातील कृषी उत्पन्न बाजार (APMC) समित्यांना महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करातून (Property Tax) सूट द्यावी, अशी मागणी राज्य बाजार समिती सहकारी संघाने शासनाकडे केली आहे. या मालमत्ता कराच्या मोबदल्यात शेतकऱ्यांच्या संबंधितांकडून अपेक्षित सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. त्यामुळे मालमत्ता करमाफी द्यावी, अशी मागणी संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांनी केली आहे.

‘महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन व विनियमन १९६३ व नियम १९६७’ अन्वये राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापित झालेल्या आहेत. या स्थानिक प्राधिकारी संस्था आहेत. मालमत्ता कराच्या मोबदल्यात शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने नगर परिषदा बाजार समित्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा देत नाहीत.

तेव्हा एकतर मालमत्ता कर संपूर्णपणे माफ करावा किंवा त्या मोबदल्यात नगर परिषदेने लाइट, पाणी, गटार, शेड इत्यादी सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी बाजार समित्यांकडून सातत्याने करण्यात येत होती. त्यावर बाजार समिती संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतही चर्चा होऊन मालमत्ता करमाफी मिळण्याबाबत ठरावही मंजूर झाल्याचे सोमवंशी यांनी सांगितले.

‘महापालिका कायद्यात दुरुस्ती करा’

बाजार समित्यांना करातून माफी मिळण्यासाठी महापालिका कायद्यात दुरुस्ती करून बाजार समित्यांना दिलासा देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहकार, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि पणन संचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे, अशी माहितीही सोमवंशी यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Storage : चिंताजनक! देशातील प्रमुख जलाशयांमध्ये केवळ २५% पाणीसाठा, राज्याचीही स्थिती बिकट

Nutrients Use : अन्नद्रव्यांचा योग्य पद्धतीने वापर

Tomato Disease : टोमॅटो पिकातील ‘ॲन्थ्रॅकनोज’

Fertilizer Management : आले पिकासाठी ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन

Nursery Business : ‘नर्सरी, लॅंडस्केपिंग, गार्डनिंग’ व्यवसायातील कुशल निकीता

SCROLL FOR NEXT