Farmer Producer Company  Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Producer Company : अर्जुना रिव्हरसाइड फार्मर प्रोड्यूसर कंपनीची स्थापना

तळवडे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथे शेतकऱ्यांनी एकत्र येत अर्जुना रिव्हरसाइड फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि.ची स्थापना केली आहे.

Team Agrowon

पुणे ः तळवडे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथे शेतकऱ्यांनी एकत्र येत अर्जुना रिव्हरसाइड फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि.(Arjuna Riverside Farmer Producer Company ) ची स्थापना केली आहे. नुकतीच या कंपनीची घोषणा करण्यात आली. तळवडे (Talvade) येथील भूमिपुत्र आणि पितांबरी प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभूदेसाई हे कंपनीचे अध्यक्ष आहेत.

तळवडे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रदीप प्रभूदेसाई हे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रणव मुळे हे समन्वयकपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.सुरुवातीला रत्नागिरी जिल्ह्यातील भात, बांबू, ऊस, केळी आणि भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांना कंपनीचे सदस्यत्व मिळणार आहे.

या पिकांसाठी लागणारे सर्व प्रकारचे साह्य कंपनीकडून करण्यात येणार असून, शेतीमालाची रास्त दरात खरेदी आणि विक्रीदेखील कंपनीकडून करण्यात येणार आहे. पितांबरी कंपनी गेल्या ३० वर्षांपासून अभिनव उत्पादनांची विक्री आणि वितरण करत असल्याने संपूर्ण देशभर कंपनीची सक्षम वितरण व्यवस्था आहे.

कंपनीच्या ॲग्रीकेअर डिव्हिजनचे महाराष्ट्रातील सर्व कृषी विद्यापीठांसोबत सहकार्याचे संबंध आहेत, अशी माहिती अर्जुना रिव्हरसाइड फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष रवींद्र प्रभुदेसाई यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT