ताज्या बातम्या

Strawberry Farming : स्ट्रॉबेरी पिकासाठीच्या दोन शिफारशींना मान्यता

Strawberry Production : ‘‘स्ट्रॉबेरी पिकात संप्रेरकांचा अनियंत्रित वापर केला जातो. यामुळे फुले व फळांची वाढ यावर विपरीत परिणाम होतो.

Team Agrowon

Satara News : ‘‘५९ व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची बैठक २५ ते २७ मे दरम्यान महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे झाली. या बैठकीत स्ट्रॉबेरी पिकातील दोन शिफारशींना समितीची मान्यता मिळाली आहे,’’ अशी माहिती विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र, महाबळेश्‍वर येथील शास्त्रज्ञ डॉ. दर्शन कदम यांनी दिली.

डॉ. कदम म्हणाले, ‘‘स्ट्रॉबेरी पिकात संप्रेरकांचा अनियंत्रित वापर केला जातो. यामुळे फुले व फळांची वाढ यावर विपरीत परिणाम होतो. तसेच लागवडीचा कालावधी देखील निश्‍चित नसल्याने रोपांचे व फळांचे नुकसान होते. या समस्यांवर उपाय म्हणून विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र, महाबळेश्‍वर येथे तीन वर्षांच्या संशोधनानंतर काही शिफारशी करण्यात आल्या आहेत.’’

या संशोधनासाठी डॉ. कदम यांच्यासह डॉ. मनीष सुशीर, डॉ. विक्रांत साळी, डॉ. संदीप दिधुळे आणि केंद्र प्रमुख डॉ. दीपक देशमुख यांनी मेहनत घेतली. तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील उद्यानविद्या विभागाचे प्रमुख डॉ. श्रीमंत रणपिसे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. आर. आर. सूर्यवंशी, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार आणि कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

...अशा आहेत मान्यताप्राप्त शिफारशी

स्ट्रॉबेरी पिकाच्या अधिक उत्पादन आणि आर्थिक फायद्यासाठी महाबळेश्‍वर पठारावर लागवडीनंतर ३० दिवसांनी ‘जिब्रेलिक आम्ल’ची २५ पीपीएम या प्रमाणात फवारणी करावी.

- स्ट्रॉबेरी पिकाच्या अधिक उत्पादन आणि आर्थिक फायद्यासाठी महाबळेश्‍वर पठारावर वाफसा परिस्थितीत ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात लागवड करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT