Strawberry Season : यंदाचा स्ट्रॉबेरी हंगाम शेतकऱ्यांना लाभला

Team Agrowon

स्ट्रॅाबेरी हे थंड हवेत येणारे फळ असल्याने महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॅाबेरीला देशभरातून मागणी असते.

Strawberry Season | Agrowon

यंदाचा स्ट्रॉबेरीचा हंगाम महाबळेश्वरमधील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरला आहे. यावर्षीच्या हंगामात स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळाला आहे.

Strawberry Season | Agrowon

या हंगामात स्ट्रॉबेरीला सरासरी ६० ते ६५ रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे. गेल्या हंगमाच्या तुलनेत यंदा किलोमागे दरात सरासरी पाच ते दहा रुपयांची वाढ झाली आहे.

Strawberry Season | Agrowon

यंदाच्या हंगामात वेळेवर लागवड झाली होती. यावर्षी महाबळेश्वरमध्ये सुमारे तीन हजार हेक्टरवर स्ट्रॉबेरीची लागवड झाली.

Strawberry Season | Agrowon

हंगामाच्या सुरवातीला स्ट्रॅाबेरीला चांगला दर मिळतो. याही हंगामात २०० ते ३०० रुपयांपर्यंत दर मिळाला.

Strawberry Season | Agrowon

महाबळेश्वर तालुक्यातून एका हंगामात सरासरी ३० ते ३५ हजार मेट्रीक टन स्ट्रॅाबेरीचे उत्पादन मिळते.

Strawberry Season | Agrowon

या हंगामात उत्पादनात घट झाली असली तरी दरात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Strawberry Season | Agrowon
Dragon Fruit | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...