Lumpy Skin  Agrowon
ताज्या बातम्या

Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’ प्रतिबंधासाठी लसीकरणावर भर

लम्पी स्कीनला रोखण्यासाठी लसीकरणावर अधिक भर देण्यात येत असून बाधित क्षेत्रातील पाच किलोमीटर परिघातील १० हजार २२० जनावरांचे लसीकरण करण्यास पशुसंवर्धन विभागाला यश आले आहे.

टीम ॲग्रोवन

अलिबाग ः रायगड जिल्ह्यामध्ये लम्पी स्कीन त्वचा (Lumpy Skin Disease) आजाराचा प्रादूर्भाव वाढत आहे. कर्जत, रोहा व अलिबाग तालुक्यांत बाधित २९ जनावरे आढळली आहेत. पशुसंवर्धन (Department of Animal Husbandry) विभागामार्फत बाधित जनावरांवर उपचार सुरू आहेत. लम्पी स्कीनला रोखण्यासाठी लसीकरणावर (Lumpy Vaccination) अधिक भर देण्यात येत असून बाधित क्षेत्रातील पाच किलोमीटर परिघातील १० हजार २२० जनावरांचे लसीकरण करण्यास पशुसंवर्धन विभागाला यश आले आहे.

जिल्ह्यात ४० हजार लसींचा साठा उपलब्ध असून आतापर्यंत एकूण १३ हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. गाय, म्हैस वर्गातील जनावरांना लम्पी स्कीन हा संसर्गजन्य आजार होत आहे. कर्जतमध्ये सर्वात आधी लम्पी स्कीनबाधित जनावरे आढळल्‍याने पशुसंवर्धन विभाग कामाला लागले. जिल्हा परिषदेच्या १०० व राज्य शासनाच्या २२ अशा एकूण १२२ पशुवैद्यकीय दवाखान्यांतील अधिकाऱ्यांना दक्षतेचा इशारा दिला.

जनजागृती सुरू केली. कर्जतमधील पिंपलोली, आंबिवली, वावे, खांडस, मिरचुलवाडी अवचरे या गावांमध्ये लम्पी स्कीनबाधित २३ जनावरे, रोहातील आंबिवली, दुर्तली गावामध्ये ३ व अलिबाग तालुक्यातील चौल येथे ३ अशी एकूण २९ जनावरे बाधित आढळली; तर कर्जत तालुक्यातील एक बैल दगावला असून दोन गंभीर असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाकडून देण्यात आली.

गोशाळेत शंभर टक्के लसीकरण

लम्पी स्कीनचा प्रसार होऊ नये, गोशाळेतील पशुधनाचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील गोशाळेमधील गाईंचे लसीकरण करण्यात आले असून एकूण दोन हजार ४१८ लसीकरण झाले आहे. शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाल्‍याचे या वेळी सांगण्यात आले. उपचार, शवविच्छेदन सेवा मोफत लम्‍पी स्कीन त्वचा आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविल्यामुळे आजार नियंत्रणात आहे.

बाधित पशुधनावरील उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकारमार्फत मोफत करण्यात येत असून लसीकरण, उपचार व शवविच्छेदन या सेवा पशुसंवर्धन विभागामार्फत मोफत दिल्या जात आहेत. जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रत्येक जिल्ह्यास एक कोटी निधी तातडीने उपलब्ध करण्यात आला आहे. आजारामुळे मृत जनावरांच्या पशुपालकांना मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

तालुका बाधित एकूण गुरे लसीकरण झालेले

कर्जत २३ ८२६२ ७९०७

रोहा ३ १३८७ १२००

अलिबाग ३ १०६७ ५००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Compartment Bunding: ओलावा संवर्धनासाठी कंपार्टमेंट बांध

Amit Shah: 'मी संसदेत उत्तर देण्यास तयार'; विरोधकांच्या गदारोळावर अमित शहांनी मौन सोडलं

Paneer Adulteration Action: भेसळखोरांवर मकोका; अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याचे निर्देश

Sugarcane Variety: रसवंतीसाठी ऊस जात : कोव्हीएसआय ०३१०२

Sugarcane Pyrilla: उसातील पायरीला किडीचे एकात्मिक व्यवस्थापन; वेळीच नियंत्रण टाळेल उत्पादनाचे नुकसान

SCROLL FOR NEXT