Animal Care Agrowon
ताज्या बातम्या

Animal Care : विषबाधेमुळे केळवदला अकरा शेळ्यांचा मृत्यू

चाऱ्यात विषारी औषध टाकल्याने हा विषारी चारा खाऊन दहा शेळ्या व एका बोकडाचा मृत्यू झाला.

Team Agrowon

नागपूर ः चाऱ्यात विषारी औषध टाकल्याने हा विषारी चारा खाऊन दहा शेळ्या (Goats) व एका बोकडाचा मृत्यू (Death) झाला. याप्रकरणी शेतकरी (Farmer) महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या दोन नातेवाइकांविरोधात गुन्हा (crime) दाखल केला आहे.

केळवद (ता. सावनेर) येथील सरला गणेश बालपांडे (वय ३७) या शेळीपालन करतात. त्यांची रायबासा शिवारात शेती आहे. याच शेतात त्यांनी शेळीपालनाच्या उद्देशाने शेड बांधले असून, त्याच ठिकाणी शेळ्या बांधल्या जातात. त्यांच्या शेडमध्ये लहान-मोठ्या मिळून दहा शेळ्या आणि एक बोकड होते. त्यांचा अचानक मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. चाऱ्यात विष टाकण्यात आल्याने शेळ्यांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली.

याप्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीत खुशाल फत्तू बालपांडे व त्यांचा मुलगा राहुल बालपांडे यांनी शेडच्या दाराचे कुलूप तोडत प्रवेश केला. त्यानंतर चाऱ्यात विष मिसळले. त्यांच्या या कृतीमुळे आपले १ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT