Agriculture Electricity Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Electricity : ‘चालू बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज कापावी’

महावितरणची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे वसुलीशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट करीत चालू बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांचे वीजजोड कापावेत,’’ असे निर्देश महावितरणचे कार्यकारी संचालक विजय सिंघल यांनी येथे दिले.

टीम ॲग्रोवन

नागपूर ः ‘‘महावितरणची (Mahavitaran) आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे वसुलीशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट करीत चालू बिल (Electricity Bill) न भरणाऱ्या शेतकऱ्यांचे वीजजोड (Power Supply Cut Off) कापावेत,’’ असे निर्देश महावितरणचे कार्यकारी संचालक विजय सिंघल यांनी येथे दिले.

शुक्रवारी (ता. २५) नागपुरात सिंघल यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दोडके, पुष्पा चव्हाण, राजेश नायक, सुनील देशपांडे उपस्थित होते.

वीजबिलाची थकीत वसुली हाच मुद्दा या बैठकीच्या अजेंड्यावर होता, असे सूत्रांनी सांगितले. सिंघल म्हणाले, ‘‘कंपनीची आर्थिक स्थिती अतिशय हलाखीची आहे. कंपनीवर प्रचंड कर्ज झाले आहे. नवीन कायद्यांमुळे कर्ज घेण्याची क्षमताही कमी झाली आहे.

त्यामुळे कंपनीचे अस्तित्व राखण्यासाठी आता वीजबिलाची वसुली अत्यावश्‍यक झाली आहे. घरगुती ग्राहकांसोबतच कृषिपंपाच्या थकीत रकमेचा आकडा मोठा आहे. त्यामुळे अशा थकीत ग्राहकांची वीज कापण्याशिवाय इतर कोणताच पर्याय कंपनीसमोर उरलेला नाही.’’

‘‘उपमुख्यमंत्र्यांनी सध्याचे बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित न करण्याची सूचना केली. त्यांना वगळून इतर कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करा. बिल न भरणाऱ्यांची वीज कापण्याशिवाय आता कोणताच पर्याय नाही,’’ असे सिंघल म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: राज्यात वादळी पावसाचा अंदाज

Maharashtra Heavy Rain: कोकणात पावसाचा धुमाकूळ; राज्यात जोर कायम

Mango Festival: अमेरिकेला भारतीय आंब्यांची गोडी

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

SCROLL FOR NEXT