Electricity Bill Agrowon
ताज्या बातम्या

Electricity Bill : नळपाणी पुरवठा योजनांना वीजबिलाचा शॉक

Water Supply Scheme : वाढीव वीजबिलांचा ग्रामीण भागातील नळपाणी पुरवठा योजनांना फटका बसत आहे.

Team Agrowon

Alibaug News : वाढीव वीजबिलांचा ग्रामीण भागातील नळपाणी पुरवठा योजनांना फटका बसत आहे. सरासरीपेक्षा जास्त बिले येत असल्याने, ती कशी भरायची, असा प्रश्न रायगड जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींना पडला आहे. चिंचवलीतील पाणी पुरवठा समितीने केलेल्या पाठपुराव्यामुळे महावितरण कंपनीतील गोंधळ उघडकीस आला असून याबाबत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

राज्य सरकारचा पाणी पुरवठा विभाग व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्चून ग्रामीण भागात अनेक नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. या योजनांमुळे महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरण्यास मदत झाली आहे. तर अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. मात्र महावितरणच्या भोंगळ कारभाराचा मोठा फटका पाणी योजनांना बसतो आहे.

वीज दरात कोणतीही वाढ झाली नसताना, वापरही तितकाच असताना सरासरीपेक्षा दुप्पट व तिप्पट बिले आकारली जात असल्याने नवे संकट उभे राहिले आहे. विशेष म्हणजे वीजमीटरही तेच आहेत. त्‍याची तपासणी केली असता दोषही आढळत नाही, कोणती थकबाकी नसतानाही अवास्तव वीज बिले येत असल्‍याने ती भरायची कशी, असा प्रश्‍न पाणी पुरवठा समितीला पडला आहे. याबाबत महावितरण कंपनीकडे तक्रार केली असता बिले भरावीच लागतील, अन्यथा वीजपुरवठा बंद त येईल, अशी उत्तरे कर्मचारी देतात.

गोरेगाव विभागातील चिंचवली ग्रामपंचायत पाणी पुरवठा योजना २००९ पासून कार्यान्वित आहे. योजनेसाठी २५ हॉर्सपॉवरचे दोन पंप वापरात आहेत. त्यापैकी एका वेळेस एकच पंप कार्यरत असतो. जवळपास ८५० घरांना नळजोडणी करून पाणी पुरवले जाते.

सरासरी १५ ते १६ हजार युनिट वापरले जाते, ज्याचे बिल सुरुवातीला तीस ते पस्तीस हजार इतके येत होते. महावितरणचे दर वाढल्यानंतर हेच बिल दुपटीने म्हणजे ६० ते ६५ हजार रुपयांपर्यंत वाढले. तीन महिन्यांत कोणतीही दरवाढ झाली नसताना आता वीज बिल एक लाखाहून अधिक येत आहे.

चिंचवली ग्रामपंचायतीमध्ये पाणी पुरवठा योजनेचे भरमसाट बिल आले आहे. मीटर योग्‍यरीत्‍या कार्यरत असून किती युनिट वीज वापरली याची नोंदही योग्‍य प्रकारे होत आहे. त्यानुसारच बिलाची आकारणी झाली आहे. मीटरमध्ये काही बिघाड असेल तर ते तपासून पाहण्यासाठी पेण कार्यालयातील तज्ज्ञ अभियंते पाहणी करणार आहेत. त्याचबरोबर मीटरच्या ब्लॅक बॉक्सचा डाटा तपासला जाणार आहे. बिघाड सापडल्यानंतर नव्याने वीज बिलाची आकारणी केली जाईल.
- आर. ए. मुलाणी, अधिक्षक अभियंता, वीज वितरण कंपनी, पेण

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT