Agriculture Electricity Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Electricity : कृषी पंपाची वीजबिल वसुली अडीच कोटींवर

कृषीपंपांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी हवी असणारी वीज खरेदी व रोहीत्रांच्या देखभालीसाठी लागणारा निधी उभा करण्यासाठी कृषीपंप धारकांकडे थकीत असलेले व चालू देयक वसुल करण्यासाठी महावितरण विविध माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे.

Team Agrowon

नांदेड : कृषीपंपांना अखंडित वीजपुरवठा (Electricity Bill Recovery) करण्यासाठी हवी असणारी वीज खरेदी व रोहीत्रांच्या देखभालीसाठी लागणारा निधी उभा करण्यासाठी कृषीपंप धारकांकडे थकीत असलेले व चालू देयक वसुल करण्यासाठी महावितरण विविध माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे.

या सुसंवादाच्या प्रक्रियेतूनच महावितरणच्या नांदेड ग्रामिण विभागाने गेल्या दहा दिवसात तब्बल दोन कोटी ४२ लाख रुपयांची कृषीपंपाची वीजबिले जमा करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता आर. पी. चव्हाण यांनी दिली.

कंधार, लोहा, मुदखेड व अर्धापूर तालुक्यांचा समावेश असलेल्या नांदेड ग्रामिण विभागाने सांघिक कार्यालयाच्या निर्देशानुसार कृषीपंपाच्या वसुलीसाठी विविध माध्यमांचा वापर करत वीजबिल वसुल होण्याची गरज ग्राहक मेळावे, बैठकांच्या सुसंवादातून पटवून दिल्यानंतर ग्रामिण विभागातील कृषीपंप धारकांनी सकारात्मकता दर्शवत चालू वीजबिलांचा तीन हजार ५७० शेतकऱ्यांनी दोन कोटी ४२ लाख रुपयांचा भरणा केला आहे.

यासाठी विभागातील सर्व सहायक अभियंते, जनमित्र यांनी सुट्यांच्या दिवशीही कार्यरत राहत वीजबिल वसुलीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री दत्तात्रय पडळकर व अधीक्षक अभियंता श्री सुधाकर जाधव यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि मार्गदर्शनामुळे आम्ही अपेक्षीत यश प्राप्त करणे सोपे जात असल्याचे मत कार्यकारी अभियंता आर.पी. चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

स्वर्गीय विलासराव देशमुख अभय योजने अंतर्गत कलंबर सहकारी साखर कारखान्याने सहभाग नोंदवत थकीत रक्कम एक लाख ६४ हजार ९८२ रुपयांचा एकरकमी भरणा केला आहे. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालकांनी कार्यकारी अभियंता आर. पी. चव्हाण यांना वीजबिलाचा धनादेश सुपूर्द केला. याप्रसंगी उपकार्यकारी अभियंता सचिन दवंडे, सहायक अभियंता शिवाजी वाघमारे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT