Sugar Mill Agrowon
ताज्या बातम्या

Cooperative Sugar Mill : ‘मकाई’ची सोमवारी, ‘सहकार शिरोमणी’ची मंगळवारी अंतिम यादी

सोलापूर जिल्ह्यातील चार सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.

Team Agrowon

Solapur News सोलापूर जिल्ह्यातील चार सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्यासाठी सोमवारी (ता.२४) तर पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची अंतिम मतदार यादी मंगळवारी (ता.२५) प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर या कारखान्यासाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

माळशिरस तालुक्यातील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. या कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी नागेश पाटील म्हणाले, या कारखान्याच्या ऊस उत्पादक गटातील १५ व राखीव मतदार संघातील ६ जागांसाठी अशा एकूण २१ जागांसाठी १७ ते २१ एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले आहेत.

या मुदतीत जवळपास ४५ च्या आसपास अर्ज दाखल झाले आहेत. दाखल झालेल्या अर्जांची छाननी सोमवारी (ता. २४) होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २५ एप्रिल ते ९ मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. आवश्‍यकता भासल्यास २१ मे रोजी मतदान व २२ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

आदिनाथची प्रक्रिया प्रतीक्षेत

करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम अद्यापही जाहीर झालेला नाही. या कारखानच्या प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम येत्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशिल कारखाना म्हणून आदिनाथ साखर कारखान्याकडे पाहिले जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT