Gram Panchayats Election
Gram Panchayats Election Agrowon
ताज्या बातम्या

Grampanchayat Election : नंदुरबारात १२३ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

Team Agrowon

नंदुरबार : राज्य निवडणूक आयोगाच्या (Election Commission) आदेशानुसार ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, (Grampanchayat Election) नव्याने स्थापित तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नंदुरबार जिल्ह्यातील १८, अक्कलकुवा ३१, अक्राणी ४७, तळोदा १, शहादा १० व नवापूर १६ अशा एकूण १२३ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम असा राहील. तहसीलदार १८ नोव्हेंबर २०२२ ला निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नमुना ‘अ’मध्ये नमूद ठिकाणी २८ नोव्हेंबर २०२२ ते २ डिसेंबर २०२२ ला सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागविता व सादर करता येतील.

५ डिसेंबरला सकाळी अकरापासून नामनिर्देशनपत्र छाननी करण्यात येईल. ७ डिसेंबरला दुपारी तीनपर्यंत नामनिर्देशपत्र मागे घेता येईल. ७ डिसेंबरला दुपारी तीननंतर निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील.

अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. १८ डिसेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान होईल, तर २० डिसेंबरला (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील त्यानुसार राहील.

मतमोजणी होणार असून, निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना २३ डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात येईल. निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील, असे सदगीर यांनी कळविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

SCROLL FOR NEXT