APMC Election Agrowon
ताज्या बातम्या

Karmala APMC Election : करमाळा बाजार समितीसाठी आठ ऑक्टोबरला निवडणूक

APMC Election Maharashtra : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली असून, येत्या सोमवारपासून (ता. ४) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे.

Team Agrowon

Solapur News : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली असून, येत्या सोमवारपासून (ता. ४) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे. या निवडणुकीसाठी आठ ऑक्टोबरला मतदान आणि दुसऱ्या दिवशी लगेच नऊ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी या निवडणुकीसंबंधीचा आदेश काढला आहे. या आधी करमाळ्यासह सोलापूर आणि बार्शी या दोन बाजार समित्यांच्या संचालक मंडळाचीही मुदत संपली आहे.

पण त्या दोन्ही बाजार समित्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. पण करमाळा बाजार समितीची मात्र निवडणूक जाहीर झाली आहे. बाजार समितीच्या १८ संचालकांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यात सर्वसाधारण गटासाठी ७ जागा, महिलांसाठी दोन जागा, इतर मागासवर्ग एक, ग्रामपंचायत मतदारसंघातून चार, अनुसूचित जमाती प्रवर्ग आणि आर्थिक दुर्बल घटकातून प्रत्येकी एक आणि व्यापारी मतदारसंघातून एक आणि हमाल-तोलारमधून एक असे १८ उमेदवार निवडले जाणार आहेत.

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीवर आत्तापर्यंत माजी आमदार जयवंतराव जगताप यांची सत्ता होती. पण गतनिवडणुकीत जगताप गटाची सत्ता गेली होती. त्यावेळी बाजार समितीच्या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. त्यामुळे ही निवडणूक चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा या निवडणुकीमुळे राजकीय हालचालींना वेग आला असून, यावेळची राजकीय गणिते मात्र वेगळी आहेत.

असा असेल निवडणूक कार्यक्रम

उमेदवारी दाखलासाठी ४ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर असा कालावधी आहे. ११ सप्टेंबरला दाखल उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. १२ ते १६ सप्टेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. २७ सप्टेंबरला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. तर ८ ऑक्टोबरला मतदान आणि ९ ऑक्टोबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: शेवगा भाव नरमले; सोयाबीन स्थिरावले, कापसात चढ उतार, केळीचे दर टिकून तर गवार तेजीतच

PM Kisan Yojana: अर्थसंकल्पात 'पीएम किसान'साठी किती तरतूद?; २२ वा हप्ता 'या' तारखेला मिळू शकतो

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेंतर्गत ई-केवायसीतील चुकीमुळे लाभ बंद झालेल्या महिलांसाठी दिलासा! शासन फेरपडताळणी सुरू करणार

Ambeohol Dam Project Issue: आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचे भिजत घोंगडे

Union Budget 2026: काजू, नारळावर भर; शेतकऱ्यांसाठी ठोस धोरण नाही

SCROLL FOR NEXT