apmc election Agrowon
ताज्या बातम्या

APMC Election Update : भंडारा जिल्ह्यात पाच बाजार समित्यांमध्ये रणधुमाळी

बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे.

Team Agrowon

Bhandara News : बाजार समित्यांचा निवडणूक (APMC Election) कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे. परिणामी सहकार क्षेत्रातील राजकारण तापले असून निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. (Latest Agriculture News)

वर्षभरापासून विविध कारणांनी बाजार समित्यांची निवडणूक पुढे ढकलण्यात येत होती. त्यामुळे बाजार समितीच्या प्रशासकांना वाढीव कालावधी मिळाला. आता मात्र, २८ व ३० एपिल रोजी जिल्ह्यातील भंडारा, पवनी, लाखनी, लाखांदूर व पवनी या पाचही बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

विशेषतः यंदाच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद आजमणार आहेत. काही समित्यांमध्ये जुन्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा संधी मिळते, की नवे चेहरे दिसतात. याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष्य लागले आहे. अनेकांनी त्याकरिता पूर्व तयारी केली असून राजकीय पक्ष आघाडी करतात की स्वतंत्र लढतात हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.

भंडारा जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना देखील उमेदवार म्हणून लढता येणार आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक अधिक चुरशीची ठरेल, असे राजकीय विश्‍लेषक सांगत आहेत

शेतकऱ्यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार असला तरी त्यांना मतदानाचा अधिकार मात्र देण्यात आला नाही. दरम्यान, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य तसेच सोसायटी संचालकांचा मतदार यादीत समावेश करून नुकतीच अंतिम मतदार यादीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT