Gram Panchayat by-election on 18th January in Akola district 
ताज्या बातम्या

Gram Panchayat Elections : भातकुली तालुक्यात निवडणूक रणधुमाळी

भातकुली तालुक्यात ११ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून गावपुढारी कामाला लागले आहेत.

Team Agrowon

टाकरखेडासंभू, अमरावती : भातकुली तालुक्यात ११ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकांची (Gram Panchayat Elections) रणधुमाळी सुरू झाली असून गावपुढारी कामाला लागले आहेत. तालुक्यात ११ सरपंचपदासह ९५ सदस्यांकरिता निवडणूक (Elections) होऊ घातली आहे. याकरिता १८ डिसेंबरला मतदान (Voting), तर २० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

भातकुली तालुक्यात ५० च्या ग्रामपंचायती आहेत. त्यामधील ११ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ डिसेंबरपर्यंत संपुष्टात येत असल्याने येथे निवडणुका लावण्यात आल्या आहेत. यात पाच ग्रामपंचायतींचा नोव्हेंबरमध्ये, तर सहा ग्रामपंचायतींचा कार्यकाळ डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपत आहे. याकरिता २८ नोव्हेंबर ते दोन डिसेंबरदरम्यान नामांकन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

या ११ ग्रामपंचायतींमध्ये ११ सरपंचांसह ९५ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. त्यामुळे आता दिग्गजांसह युवकांनीदेखील उडी घेतली असून, या निवडणुकांमध्ये चांगली रंगत येणार आहे. यात पूर्णानगर ग्रामपंचायतींमध्ये १३, कुमागड सात, कानफोडी सात, पोहरापूर्णा सात, वाकी रायपूर सात, खोलापूर १७, शिवणी बुद्रुक सात, हरतोटी सात, सोनारखेडा सात, परलाम नऊ व खालखोनी ग्रामपंचायतींमध्ये सात सदस्य पदांकरिता निवडणूक होणार आहे. या ग्रामपंचायतींमध्ये पहिल्यांदाच थेट सरपंचपदाकरिता निवडणुका होऊ घातल्याने नागरिकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT