Buldana News Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Scheme : ‘शेतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या योजना प्रभावीपणे राबवा’

Latest Agriculture News : शेतीच्या शाश्‍वत विकासासाठी उपयुक्त ठरतील अशा योजना आणि उपक्रम एकत्रितपणे राबविल्यास शेतीच्या उत्पादकतेत निश्‍चितपणे वाढ होण्यासाठी मदत होणार आहे.

Team Agrowon

Buldana News : शेतीच्या शाश्‍वत विकासासाठी उपयुक्त ठरतील अशा योजना आणि उपक्रम एकत्रितपणे राबविल्यास शेतीच्या उत्पादकतेत निश्‍चितपणे वाढ होण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे येत्या काळात शेतीशी निगडित सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाची आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी खरीप हंगामाचा आढावा घेतला.

जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस ही महत्त्वाची पिके असून, या पिकावरील प्रादुर्भावाची माहिती घेतली. तसेच यावर करावयाच्या उपायोजनांबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात यावी, असे सांगितले.

संभाव्य चाराटंचाई जाणवणार नाही, यासाठी आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. वैरण विकास कार्यक्रमांतर्गत चाऱ्याच्या सुधारित वाणांचा वापर करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा परिषदेने अधिकचा निधी घेऊन वैरणीसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

जिल्हा टंचाईमुक्त होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी रोजगार हमी योजनेतून कामे घेण्यात यावी. प्रत्येक गावात जलयुक्त शिवारचा उपक्रम राबविण्यात यावा. प्रामुख्याने खारपाण पट्ट्यात शेततळे घेण्यात यावे. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध मदती आणि अनुदानाचे वाटप, तसेच लाभ मिळविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ई-केवायसी अशा प्रलंबित बाबी सेवा सप्ताहामध्ये हाती घेऊन त्याचा मोठा प्रमाणावर निपटारा करावा.

पीकविम्याचा लाभ घेण्यासाठी ई-पीकपाहणीला प्रोत्साहन देण्यात यावे. प्रत्येक शेतकऱ्याने नुकसानीचा फोटो काढून अपलोड करावा. शेतकऱ्यांना पीकविम्याचा फायदा होण्यासाठी पावसाच्या खंडाची माहिती कळविण्यात यावी.

विमा कंपन्या या शेतकऱ्यांना मदत देण्यास अनुत्सुक असल्याने पीकविम्याचा लाभ मिळण्यासाठीच्या आवश्यक कार्यवाही तातडीने करण्यात याव्यात, असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT