Greenhouse Technology Agrowon
ताज्या बातम्या

Greenhouse Technology : हरितगृह तंत्रज्ञान सहकार्यासाठी नेदरलॅन्डच्या कंपन्या उत्सुक

भारतातील कृषी उद्योग समूह तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत उच्चतंत्रज्ञानावर आधारित हरितगृहातील शेती विकासात व्यावसायिक करार करण्याची तयारी नेदरलॅन्डमधील कंपन्यांनी दर्शविली आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे ः भारतातील कृषी उद्योग समूह तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत उच्चतंत्रज्ञानावर आधारित हरितगृहातील शेती विकासात व्यावसायिक करार (Agricultural Business Contract) करण्याची तयारी नेदरलॅन्डमधील कंपन्यांनी दर्शविली आहे. यासाठी नेदरलॅंन्डमधील हरितगृह तसेच उच्च तंत्रज्ञानामध्ये कार्यरत विविध कंपन्यांनी एकत्र येत ‘डच ग्रीनहाऊस डेल्टा‘ (Dutch Greenhouse Delta) हा गट तयार केला आहे.

या गटातील निवडक कंपन्यांनी अहॉय, रॉटरडॅम येथे नेदरलॅंड सरकारसोबत व्यावसायिक करारावर सह्या केल्या. नेदरलॅन्डमधील विविध कंपन्यांचा गट येत्या तीन वर्षांच्या कालावधीत भारतातील कृषी उद्योग समूह तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत पॉलिहाऊसमधील भाजीपाला, बेरीवर्गीय फळांचे उत्पादन तंत्र, पीक व्यवस्थापन, सेन्सर तंत्रज्ञान, खत, पाणी व्यवस्थापन तंत्रज्ञान तसेच काढणीपश्चात तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन तसेच व्यावसायिक करार करणार आहे.

या माध्यमातून निर्यातक्षम भाजीपाला, बेरीवर्गीय फळांच्या उत्पादनासाठी भारतीय शेतकऱ्यांना आधुनिक उच्च तंत्रज्ञान उपलब्ध होईल. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, हिमाचल प्रदेश या राज्यातील कंपन्यांसोबत करार करण्याची उत्सुकता या कंपन्यांनी दर्शविली आहे.

‘डच ग्रीनहाऊस डेल्टा‘चे भारतातील व्यावसायिक सल्लागार देश रामनाथ म्हणाले, ‘‘नेदरलॅन्डमधील हरितगृह तंत्रज्ञानात कार्यरत अकरा कंपन्यांनी भारतातील कृषी क्षेत्रात वाढत्या संधी लक्षात घेऊन निर्यातक्षम भाजीपाला, फळांच्या उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन आणि व्यावसायिक करार करण्यासाठी ‘नेदरलॅन्ड हॉर्टी रोड टू इंडिया‘ संकल्पनेतून पुढाकार घेतला आहे.

या कंपन्यांचे तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन भारतीय शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल. या करारामुळे गुणवत्तापूर्ण शेतीमालाचे उत्पादन घेता येईल. रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. नोव्हेंबर महिन्यात या कंपन्यांचे प्रतिनिधी बेंगलूरू येथे आयोजित ‘टेक समिट'मध्ये सहभागी होतील. हे प्रतिनिधी पुणे आणि मुंबईमधील कृषी उद्योग समुहांशी चर्चाही करतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT