Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : सततच्या पावसामुळे पिकांची नासाडी थांबेना

परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ४४ मंडलांत रविवारी (ता.७) सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. या दोन जिल्ह्यांतील पावसाचे सत्र सुरुच आहे.

Team Agrowon

Crop Damage परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ४४ मंडलांत रविवारी (ता.७) सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. या दोन जिल्ह्यांतील पावसाचे (Unseasonal Rain) सत्र सुरुच आहे.

त्यामुळे काढणीला आलेली उन्हाळी भुईमूग, बाजरी, ज्वारी, कांदा, टोमॅटोसह भाजीपाला पिके, आंबा, लिंबू आदींची नासाडी थांबत नाही. हळद सततच्या पावसात भिजत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांतील १९ मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. जिंतूर तालुक्यातील बोरी, आडगाव बाजार, पाथरी तालुक्यातील कासापुरी, सोनपेठ तालुक्यातील आवलगाव, शेळगाव, गंगाखेड तालुक्यातील गंगाखेड या मंडलात पावसाचा जोर राहिला.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १.७ मिमी तर एप्रिल महिन्यात आजवर एकूण २१.४ मिमी पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यातील २५ मंडलांत पाऊस झाला.

हिंगोली तालुक्यातील बासंबा, माळहिवरा, खंबाळा, कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी, वाकोडी, नांदापूर, आखाडा बाळापूर, वसमत तालुक्यातील वसमत, अंबा, हयातनगर, हट्टा, टेंभुर्णी, कुरुंदा, औंढा नागनाथ तालुक्यातील औंढा नागनाथ, साळणा, जवळा बाजार मंडलात पावसाचा अधिक जोर राहिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT