Banana Harvesting Agrowon
ताज्या बातम्या

Banana Harvesting : ढगाळ वातावरणामुळे केळीची काढणी ठप्प

खानदेशात मागील दोन दिवसांपासून ढगाळ व थंड वातावरण आहे. कमाल तापमानही १८ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. केळी, पपईची काढणी रखडत सुरू आहे.

Team Agrowon

जळगाव ः खानदेशात मागील दोन दिवसांपासून ढगाळ व थंड वातावरण (Cloudy Weather) आहे. कमाल तापमानही १८ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. केळी, पपईची काढणी रखडत सुरू आहे.

ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकात (Chana Crop) अळ्यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकरी प्रतिबंधात्मक फवारणी घेत आहेत. केळीची देखील काही भागांत काढणी (Banana Harvesting) सुरू आहे. परंतु पावसाळी व थंड वातावरणामुळे ही काढणी ठप्प झाली आहे.

हरभरा पीक खानदेशात जोमात आहे. घाटे लगडले आहेत. तर काही भागात पीक फुलोऱ्यावर आहे. पिकाची वाढ बऱ्यापैकी आहे. मध्यंतरी ढगाळ वातावरण होते. यानंतर वातावरण स्वच्छ व कोरडे झाले.

परंतु या महिन्यात पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले. यामुळे शेतकऱ्यांत भीती आहे. काही भागात पावसाची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे शेतीमाल खरेदी, वाहतूक रखडली आहे.

पपई काढणीवर आहे. ढगाळ वातावरणासोबतच वाराही सुटत आहे. वारा वेगात राहत असल्याने उंच वाढलेल्या दादर ज्वारी पिकात किंचित हानी होत आहे. पीक आडवे होत आहे. ज्या दादर ज्वारी पिकात सिंचन केलेले आहे. त्या पिकाचे वाऱ्याने नुकसान होत आहे. दादर ज्वारीदेखील निसवली आहे. त्यात दाणे भरत असल्याने झाडाचे वजन वाढले आहे.

वाऱ्यामुळे पीक आडवे होण्याची शक्यताही वाढली आहे. खानदेशात कुठेही बुधवारी (ता.४) व गुरुवारी (ता. ५) पाऊस झाला नाही. परंतु दिवसादेखील थंडी अधिक होती. सुसाट वाऱ्यामुळे थंडी अधिकच झोंबत आहे. किमान तापमान स्थिर आहे. परंतु कमाल तापमान घटल्याने दिवसा शेतात कामे करणेही अशक्य झाले आहे.

ढगाळ व थंड वातावरणामुळे सर्वच रब्बी पिकांची किंचित हानी होत आहे. दादर ज्वारी काही प्रमाणात वाऱ्यामुळे आडवी झाली आहे. तसेच केळी, पपईची काढणी रखडत सुरू आहे. कापसाची खेडा खरेदीदेखील ठप्प आहे.

- उमेश पाटील, शेतकरी, भडगाव, जि. जळगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT