Drone Training  Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Drone : शेतीतील मजूर, फवारणी समस्येवर ड्रोन ठरणार उपयुक्त

Team Agrowon

Pune News : शेती किफायतशीर करण्यासाठी ड्रोनसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. शेतीत कीटकनाशकांच्या फवारणीवेळी शेतकरी व मजुरांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता ड्रोन तंत्राने कापूस तसेच अन्य पिकात कीटकनाशकांची प्रभावीपणे फवारणी करता येऊ शकते.

शेतीत मजूर न मिळण्याच्या समस्येवर देखील ड्रोन तंत्रज्ञान येणाऱ्या काळात नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी व्यक्त केला.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि सकाळ-ॲग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था एसआयआयएलसी यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात ड्रोनविषयी राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजिली होती. कार्यशाळेचे उद्‌घाटन डॉ. पाटील यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ. पाटील म्हणाले की, ड्रोन तंत्रज्ञान वापराला शासन प्रोत्साहन देत असून ड्रोन खरेदीसाठी अनुदान उपलब्ध आहे.

भाडेतत्वावर ड्रोन देऊन ग्रामीण भागात उद्योजकतेला चालना मिळू शकते. यासाठी राहुरी कृषी विद्यापीठात जागतिक बॅंक व कास्ट प्रकल्पांतर्गत ड्रोन चालविण्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करणारा प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जातो. त्याद्वारे आतापर्यंत ५५ ड्रोन पायलट तयार करण्यात आले आहेत.

याप्रसंगी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, कृषी यंत्रे व शक्ती अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख डॉ. सचिन नलावडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी. एस. पाटील, संशोधन सहयोगी डॉ. गिरीषकुमार भणगे, प्रा. डॉ. मुकुंद शिंदे, अभियंता निळकंठ मोरे, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर इ. उपस्थित होते.

कार्यशाळेत ड्रोनचे प्रकार, फवारणीसाठी वापर, ड्रोनचे विविध घटक, फवारणीसाठी मान्यताप्राप्त रासायनिक द्रावणे इ.विषयी मार्गदर्शन तसेच ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कार्यशाळेला राज्यभरातून प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एसआयआयएलसीचे कृषी विभाग प्रमुख अमोल बिरारी यांनी प्रास्ताविक व आभार मानले. बिझनेस मॅनेजर अमित मांजरे, स्वप्नील साखरे, समन्वयक सायली गडकरी, स्वप्नील अविनाशे यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी योगदान दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season : सांगली जिल्ह्यात पावसामुळे गाळप हंगाम लांबण्याची शक्यता

Crop Damage Compensation : खानदेशात ‘केवायसी’अभावी अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

Watermelon Cultivation : खानदेशात कलिंगड लागवड रखडली

Vidhan Sabha Election Buldhana : बुलडाणा जिल्ह्यात २१.२४ लाख मतदार

Vidhan Sabha Election Beed : बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघात २१ लाखांवर मतदार

SCROLL FOR NEXT