Agricultural Drone Agrowon
ताज्या बातम्या

Agricultural Drone : कृषी विज्ञान केंद्र खामगाव येथे ड्रोनचे प्रशिक्षण

ड्रोनचे शेतीतील वापर व त्यामुळे होणारे भविष्यातील फायदे याविषयी माहिती दिली. प्रक्षेत्रावर असलेल्या हरभरा पिकामध्ये ड्रोनचे प्रात्यक्षिक देण्यात आले.

Team Agrowon

गेवराई, जि. बीड : शेतीतील ड्रोन (Agricultural Drone) वापरा विषयी जागृती व प्रसार करण्याकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ Vasantrao Naik Marathwada Agricultural University), परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, खामगाव येथे कृषी अभियांत्रिकी विभागामार्फत ‘शेतीसाठी ड्रोनचा वापर’ (Drone) या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम मंगळवारी (ता. २४) घेण्यात आला.

या प्रात्यक्षिककरिता गरुडा एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, चेन्नई यांच्याकडून ड्रोन व पायलट यांची उपलब्धता करून देण्यात आली.

यावेळी कार्यक्रम समन्वयक प्रा. दीप्ती पाटगावकर, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी श्री. जेजुरकर, तालुका कृषी अधिकारी श्री. वडकुते, सरपंच श्री. डींगरे उपस्थित होते. या प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रमांमध्ये ड्रोन विषयी विस्तृत अशी माहिती सोबतच त्याच्या वापराचे निकष याविषयी विशेषज्ञ कृषी अभियांत्रिकी विभाग डॉ. तुकेश सुरपाम यांनी मार्गदर्शन केले.

तालुका कृषी अधिकारी श्री. वडकुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. जेजुरकर यांनी ड्रोन हे शेतीसाठी कसे फायदेशीर आहे हे शेतकऱ्यांना सांगितले.

अध्यक्षीय भाषणात कार्यक्रम समन्वयक प्रा. पाटगावकर यांनी ड्रोनचे शेतीतील वापर व त्यामुळे होणारे भविष्यातील फायदे याविषयी माहिती दिली. प्रक्षेत्रावर असलेल्या हरभरा पिकामध्ये ड्रोनचे प्रात्यक्षिक देण्यात आले.

प्रात्यक्षिक देताना डॉ. सूरपाम यांनी उपलब्ध असलेल्या ड्रोनचे प्रकार, मॅनुअल व ऑटोमॅटिक सिस्टम, वापरण्याची पद्धत, ड्रोन वापरासाठी लागणारे प्रमाणपत्र, केंद्राकडून मिळणारे अनुदान व इतर महत्त्वाची माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT