Micro Irrigation Agrowon
ताज्या बातम्या

Drip Irrigation : उसासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा

Sugarcane Irrigation : उसाच्या अधिक उत्पन्नासाठी उसामध्ये ठिबक सिंचनाचा वापर करावा, असा सल्ला विभागीय विस्तार शिक्षण केंद्र, अंबाजोगाईचे डॉ. वसंत सूर्यवंशी यांनी दिला.

Team Agrowon

Dharashiv News : उसाच्या अधिक उत्पन्नासाठी उसामध्ये ठिबक सिंचनाचा वापर करावा, असा सल्ला विभागीय विस्तार शिक्षण केंद्र, अंबाजोगाईचे डॉ. वसंत सूर्यवंशी यांनी दिला.

लोहगाव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव येथे शनिवारी (ता. २९) ‘ॲग्रोवन’ व कोरोमंडल इंटरनॅशनल लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सोयाबीन व ऊस व्यवस्थापन या कार्यक्रमांमध्ये विभागीय विस्तार शिक्षण केंद्र, अंबाजोगाईचे डॉ. सूर्यवंशी बोलत होते. कार्यक्रमास लोहगावचे सरपंच प्रवीण पाटील, तुळजापूर कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. नकुल हरवाडीकर, कोरोमंडलचे बाबूराव वाघमोडे, रूपेश चौधरी उपस्थित होते.

डॉ. सूर्यवंशी म्हणाले, की ऊस हे पीक वाफसा स्थितीमध्ये चांगले वाढते आणि ठिबक सिंचन मुळे वाफसा स्थिती टिकून राहते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ठिबकचा वापर करणे आवश्यक आहे. खत देत असताना खत माती आड करणे अत्यंत आवश्यक आहे. तणनाशकाचा वापर माहिती घेऊन सुरक्षित करावा.

सोयाबीन व्यवस्थापनावरही त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. कोरोमंडलचे बाबूराव वाघमोडे यांनी कोरोमंडलच्या विविध खतांची माहिती देऊन शेतकऱ्यांनी खतांचा योग्य वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

डॉ. नकुल हरवाडीकर यांनी शेतकऱ्यांना हवामानाबाबत माहिती दिली. या वेळी प्रशांत देशमुख, शिव कलशेट्टी, महादेव सुतार, केशव मारेकर, हनुमंत लांडगे, दयानंद होळे, विजय पाटील, हरिदास शिंदे, कोरोमंडलचे नीलेश फडणीस यांच्यासह भागातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी थोडसरे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT