ajit pawar agrowon
ताज्या बातम्या

Lumpy Animal Subsidy : लम्पीने दगावलेल्या जनावरांचे अनुदान दुप्पट करा, अजित पवारांकडे मागणी

Ajit Pawar : लम्पीने दगावलेल्या जनावरांचे अनुदान दुप्पट करा या मागणीचे निवेदन गोकुळचे संचालक किसन चौगले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.

Team Agrowon

Kolhapur News : लम्पीने दगावलेल्या जनावरांचे अनुदान दुप्पट करावे व बाधित जनावरांनाही अनुदानही द्यावे. या मागणीचे निवेदन गोकुळचे संचालक प्रा. किसन चौगले यानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या महिन्यापासून लम्पीने जनावरे दगावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने मदत मिळण्याची गरज आहे.

लम्पीने बाधित झालेल्या गायी पूर्ववत दुधावर येण्यासाठी वर्ष-दीड वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे दूध उत्पादकांचे नुकसान होणार असून लम्पीची लागण झालेल्या जनावरांनाही शासनाने अनुदान द्यावे अशी मागणी गोकुळचे संचालक प्रा. किसनराव चौगले यांनी निवेदनाद्वारे केली.

लम्मीने मृत्यू झालेल्या गाय- बैलासाठी पंचवीस-तीस हजार रुपये ही भरपाई तुटपुंजी असून शासनाने भरपाईची रक्कम दुप्पट करावी अशीही मागणी प्रा. चौगले यांनी केली.

जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या सूचना

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, कागल, भुदरगड, गारगोटी, राधानगरी तालुक्यात लम्पी संसर्गरोगाने थैमान घातल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान याबाबत कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने आदेश जारी केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गायवर्णीय जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हा 'नियंत्रित क्षेत्र' म्हणून घोषित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच वीर्यमात्रेतूनही हा रोग गायवर्णीय जनावरांमध्ये पसरत असल्याने वीर्यमात्रा संकलन थांबवावे असे सांगण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, जनावरांच्या वाहतुकीला बंदी व गायवर्णीय जनावरांचे बाजार बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हा रोग सांसर्गिक असल्याने या रोगाचा प्रसार होऊ नये, म्हणून तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.

मागचा एक महिना जिल्ह्यात गायवर्णीय जनावरांना होणाऱ्या लम्पी आजाराने थैमान घातले आहे. जिल्ह्यात सध्या ३ ते ४ हजारांवर जनावरे या आजाराने बाधित आहेत. तर शेकडो जनावरे दगावली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dearness Allowance Hike: शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्ता ५५ वरून ५८ टक्के

Flame Of The Forest: वसंत ऋतूतनिसर्गाचा रंगोत्सव

Shaktipith Highway: शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, शक्तिपीठ महामार्ग रद्द करा

Anti Corruption Trap: लाच घेताना मोरोचीच्यामहिला ग्रामसेविकेला पकडले

Ujani Dam: समन्वयाअभावी तीन टीएमसी पाण्याचा अपव्यय

SCROLL FOR NEXT