Crop Damage  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Survey : नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे तत्काळ करा

गेल्या आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसाने खोची, भेंडवडे, लाटवडे परिसरातील खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

टीम ॲग्रोवन

खोची, जि. कोल्हापूर : गेल्या आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसाने खोची, भेंडवडे, लाटवडे परिसरातील खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान (Kharif Crop Damage) झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांची पाहणी (Crop Damage Survey) आमदार राजूबाबा आवळे यांनी केली. त्यांच्यासोबत कृषी, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या वेळी आवळे यांनी कृषी, महसूल अधिकाऱ्यांना पिके काढण्याच्या वेळीच जोराच्या परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे शेतीच्या बांधावर जाऊन तत्काळ करा. कसलीही कसूर न ठेवता अचूक पंचनामे करा. त्याचा नुकसान भरपाईचा अहवाल शासनाकडे पाठवून द्या, अशा सूचना दिल्या.

परतीच्या ढगफुटीसदृश पावसाने खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग, भात तसेच उसाची लागण, फुलशेती, भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक नुकसानीत सापडला आहे. त्यामुळे कृषी, महसूल, ग्रामपंचायत या विभागाने पंचनामे करून त्याचा अहवाल पाठवून द्यावा. शासनाकडे पाठपुरावा करून शंभर टक्के नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही आमदार आवळे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT