heavy Rain Yavatmal Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Survey : नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे दोन दिवसांत करा

Heavy Rain Agriculture Damage : जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे नद्या, नाल्यांना आलेल्या पुरामुळे लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले.

Team Agrowon

Yavatmal News : जिल्ह्यात पूर, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची स्थिती संवेदनशील आहे. प्रशासनाने शेती नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करून अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी प्रशासनाला दिले.

डॉ. आशिया यांनी मंगळवारी (ता.२५) जिल्ह्यातील पूरपरिस्थिती व मदत वितरणाचा आढावा घेतला. बैठकीनंतर नुकसानग्रस्त भागास भेटी देऊन पाहणी केली.

जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे नद्या, नाल्यांना आलेल्या पुरामुळे लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. कमी अधिक प्रमाणात जिल्ह्यात सर्वत्र मोठे नुकसान झाले. घरात पुराचे पाणी शिरल्याने पडझड झालेली घरे, खरडून निघालेल्या शेत जमिनी, शाळा, अंगणवाड्यांसारख्या शासकीय मालमत्तेच्या नुकसानीचा आढावा सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांकडून जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी यवतमाळ तालुक्यातील काही नुकसानग्रस्त भागांत पाहणी केली. तालुक्यातील कापरा गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जिल्हाधिकारी पोहोचले. तेथील नुकसानग्रस्त शेती, पूल आदींची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

त्यानंतर तालुक्यातीलच लासिना येथील जिल्हा परिषद शाळेला त्यांनी भेट देवून पाहणी केली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मयंक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून, तहसीलदार योगेश देशमुख आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

SCROLL FOR NEXT