Pune APMC Agrowon
ताज्या बातम्या

Pune APMC : पालेभाज्या विक्रीची जागा बदलू नये

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पालेभाज्या विक्रीची जागा वारंवार बदलली जात आहे. जागा बदलाच्या निर्णयामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे.

Team Agrowon

पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (Pune APMC) पालेभाज्या विक्रीची (Vegetable Market) जागा वारंवार बदलली जात आहे. जागा बदलाच्या निर्णयामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, खरेदीदारांनी समितीच्या निर्णयाला विरोध केला आहे.

सध्याची जागा सोयीची असल्याने विक्रीचे ठिकाण बदलू नये, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा शेतकरी संघटनांसह महात्मा फुले मंडई (Mahatma Phule Mandai) शेतमाल व्यापारी संघटनेने दिला.

सध्या केळी बाजारालगत सुरू असलेले पालेभाज्या विक्रीचे ठिकाण बदलण्याचा घाट बाजार समितीने घातला आहे.

याबाबत शेतकऱ्यांसह शेतकरी संघटना, महात्मा फुले मंडई शेतमाल व्यापारी संघटनेने बाजार समिती प्रशासनाला निवेदन दिले आहे. शेतकरी संघटनेचे भानुदास शिंदे, राजेंद्र कासुर्डे, सयाजी मोरे, सूर्यकांत काळभोर, गणेश साळुंके, अनिता ताकवणे आदी या वेळी उपस्थित होते.

केळीबाजारातील जागा वाहतूक, गर्दीच्यादृष्टीने शेतकरी आणि खरेदीदारांना सोयीची आहे. त्यामुळे पालेभाज्यांचा व्यापार केळी बाजारातच ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात बाजार समिती प्रशासनाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

गाळ्यावरच विक्रीच्या सूचना

यापूर्वी शारदा गजानन गणपती मंदिरासमोर पालेभाज्यांची विक्री केली जात होती. वाहतुकीला अडथळा होत असल्याचे कारण देत बाजार समितीने मंदिरासमोरील व्यापार पान बाजाराबाहेर नेला.

त्यानंतर बाजार समितीने केळी बाजारातील मोकळ्या जागेत पालेभाज्या विक्रीला परवानगी दिली. त्यानंतर सुरळीत व्यापार सुरू असताना अचानकपणे बाजार समितीने परिपत्रक काढत आपापल्या गाळ्यावरच पालेभाज्या विक्री करण्याबाबत सूचना केल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

Paddy Sowing: भात पेरणीची घाई करू नका

Palghar Rain Update: पावसाच्या प्रतीक्षेला अखेर विराम

Tur MSP Procurement: शेतकऱ्यांकडून तुरीची हमीभावापेक्षा कमी दरात खुल्या बाजारात विक्री?; पणनमंत्र्यांकडून महत्त्वाचा खुलासा

SCROLL FOR NEXT