Crop Damage
Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Survey : अतिवृष्टीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा ः फुंडकर

टीम ॲग्रोवन

खामगाव ः या मतदार संघात परतीच्या पावसाने अतोनात नुकसान (Crop Damage) केले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खामगाव व शेगाव तालुक्यांत तातडीने पंचनामे (Crop Damage Survey) करण्याच्या सूचना आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी केली. त्यांनी तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांना याबाबत निर्देश दिले.

खामगाव व शेगाव तालुक्यांत गेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. ऐन सोयाबीन, तूर व कापूस काढणीच्या वेळेवर आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोंगलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या गंजी शेतात पडून आहेत.

तसेच ज्यांनी सोंगणी केलेले नाही अशा शेतकऱ्यांचे सोयाबीन आता काढणीयोग्य राहिलेले नाही. पुन्हा दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला आहे. तुरीसह कपाशीचेसुद्धा मोठे नुकसान झाले आहे.

कपाशीचे बोंड गळून पडले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत, असे निर्देश आमदार फुंडकर यांनी दिले. तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासन स्तरावर सतत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT