Nagpur DCC Bank Agrowon
ताज्या बातम्या

Nagpur DCC Bank : जिल्हा बॅंक घोटाळ्याची सुनावणी नागपुरातच

Cooperative Bank Scam : नागपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या १५० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणाची सुनावणी मुंबईऐवजी नागपुरातच होणार आहे.

Team Agrowon

Nagpur News : नागपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या १५० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणाची सुनावणी मुंबईऐवजी नागपुरातच होणार आहे. या खटल्याच्या मुंबईतील सुनावणी संदर्भातील आदेश सर्वोच्च न्यायालयाने बदलला आहे. बॅंकेचे माजी अध्यक्ष तसेच आमदार सुनील केदार हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत.

जिल्हा सहकारी बॅंकेत तब्बल १५० कोटी रुपयांचा घोटाळा २१ वर्षांपूर्वी समोर आला होता. याप्रकरणी आमदार सुनील केदार यांच्यासह अनेकांवर आरोप निश्‍चीत करण्यात आले आहेत. याप्रकरणाशी संबंधित काही आरोपी हे मुंबईचे आहेत.

त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करीत या प्रकरणाची सुनावणी मुंबईला व्हावी, अशी मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर २०२२ रोजी सहआरोपी केतन कांतिलाल सेठ यांची याचिका मंजूर करून या खटल्यासह इतर काही खटले मुंबईला स्थानांतरित केले.

परिणामी, राज्य सरकार व ओमप्रकाश कामडी यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करून खटला नागपुरातच चालविण्यात यावा, अशी मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने सुधारित आदेशात स्पष्ट केले, की ९ सप्टेंबर २०२२ च्या आदेशाद्वारे २४ जून २०२१ चा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करण्याचा हेतू नव्हता. त्यामुळे नागपूरच्या विशेष अतिरिक्‍त न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी.

तसेच हा खटला अंतिम सुनावणीसाठी पुढे चालवावा. या खटल्यात आतापर्यंत दोषारोप निश्‍चित झाले आहेत. तसेच साक्षीदारांचे जबाबही नोंदविण्यात आले आहे. परिणामी, आता केवळ अंतिम सुनावणी आणि निकाल जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT