Agriculture Loan Agrowon
ताज्या बातम्या

Moneylending Loan : परभणी जिल्ह्यात २ कोटींवर सावकारी कर्जवाटप

Agriculture Loan : परभणी जिल्ह्यात सावकारी परवानाधारकांची संख्या ११० असून, त्यांनी २०२२-२३ या वर्षात १ हजार ३३५ कर्जदारांना २ कोटी ६५ लाख ३ हजार रुपये एवढे कर्ज वाटप केले आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यात सावकारी परवानाधारकांची संख्या ११० असून, त्यांनी २०२२-२३ या वर्षात १ हजार ३३५ कर्जदारांना २ कोटी ६५ लाख ३ हजार रुपये एवढे कर्ज वाटप केले आहे.

वाटप केलेले कर्ज बिगर शेती कर्ज (व्यापारी कर्ज) अंतर्गत आहे. अवैध सावकारी प्रकरणातील १८ शेतकऱ्यांच्या १९.४२ हेक्टर जमीन परत करण्याचे आदेश पारीत करण्यात आले, अशी माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्हास्तरावर जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था तथा सावकार), तालुका स्तरावर सहायक निबंधक (सहकारी संस्था तथा सावकार) यांच्या मार्फत सावकारी कायद्याची अंमलबजावणी केली जाते. नवीन सावकारी परवाने देणे, सावकारी परवाने रद्द करणे, जुन्या सावकारी परवान्याचे नूतनीकरण करणे बेकायदेशीर सावकारी करणाऱ्यांवर कारवाई करणे, सावकारांच्या अभिलेख दस्तऐवजांची तपासणी करणे आदी कामे केली जातात.

सावकारी कर्ज अंतर्गत तारण (गहाण) कर्जाचे दर दर साल दर शेकडा १५ टक्के, तर विनातारण कर्जाचे दर साल दर शेकडा १८ टक्के आहेत. परभणी जिल्ह्यात २०२०-२१ मध्ये एकूण परवानाधारक सावकारीची संख्या १०३ इतकी होती त्यापैकी नवीन १८ व नूतनीकरण ८५ केलेले होते. त्यांनी १ हजार ४०६ कर्जदारांना २ कोटी ६१ लाख ३६ रुपये एवढ्या रकमेचे कर्जवाटप केले.

२०२१-२२ मध्ये एकूण परवानाधारक सावकारांची संख्या ९२ होती त्यात नवीन १० व नूतनीकरण ८२ परवानाधारक सावकार होते. त्यांनी एकूण १ हजार ३१० कर्जदारांना २ कोटी ५८ लाख ६९ हजार रुपये इतके कर्ज वाटप केले आहे.

२०२२-२३ मध्ये नवीन तसेच नूतनीकरण केलेल्या परवानाधारक ११० सावकारांनी १ हजार ३३५ शेतकऱ्यांना २ कोटी ६५ लाख ३ हजार रुपये कर्जवाटप केले.

अवैध सावकारीतील १७४ तक्रारी निकाली...

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात २०१४ पासून अवैध सावकारीबाबत परभणी जिल्ह्यात एकूण २९९ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी १७४ तक्रारी निकाली काढल्या आहेत. एकूण १८ शेतकऱ्यांच्या १९.४२ हेक्टर जमीन परत करण्याचे आदेश मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित तक्रारीची चौकशी चालू आहे, असे सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT