Crop Loan Agrowon
ताज्या बातम्या

Crop Loan : पीकककर्जाचे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना वाटप करा ः पालकमंत्री सत्तार

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२२-२३ या वर्षासाठी प्राप्त झालेला निधी योग्य नियोजन करून विकासकामांवर वेळेत खर्च करावा, असे निर्देश कृषिमंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा

हिंगोली ः रब्बी हंगामात (Rabbi Season) पीककर्जाचे (Crop Loan) जास्तीत जास्त शेतकऱ्यांना वाटप करावे. त्याअनुषंगाने सर्व बँकांना निर्देश द्यावेत. यंदा सिंचनासाठी पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे कृषिपंपाच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी नवीन रोहित्र बसवून द्यावेत. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२२-२३ या वर्षासाठी प्राप्त झालेला निधी योग्य नियोजन करून विकासकामांवर वेळेत खर्च करावा, असे निर्देश कृषिमंत्री (Agril. Minister) तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिले.

शुक्रवारी (ता. २८) जिल्हा नियोजन समितीची बैठकीत ते बोलत होते. या वेळी आमदार सर्वश्री तान्हाजी मुटकुळे, चंद्रकांत नवघरे, डॉ. प्रज्ञा सातव, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी कुरुंदा (ता. वसमत) येथे झालेल्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने तेथील परिस्थितीचा अभ्यास करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी १० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यास तसेच लम्पी स्कीन नियंत्रणात आणण्यासाठी तातडीच्या उपाययोजनासाठी एक कोटी रुपयांचे पुनर्विनियोजन करण्यात आले.

जनावरांचा मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची कार्यवाही करावी. वन विभागाने वन प्राण्यांनी केलेल्या पीक नुकसानीची पाहणी करुन पीक नुकसानग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी. वन प्राण्यापासून पिंकाचे संरक्षण करण्यासाठी वन विभागाचा डोंगराळ भागाशेजारी चर खोदून पिकांचे नुकसान थांबवावे. एक दिवस बळीराजासाठी या अभियांनातर्गत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी, जिल्हा अधीक्षक कषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या घरी मुक्काम करून त्यांच्या समस्याचे निराकरण करावे.

नियोजनच्या कामांना नव्याने मान्यता...

या वेळी २०२२-२३ या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणसाठी २०० कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी ५१ कोटी ५० लाख व आदिवासी उपयोजनेसाठी १८ कोटी ७१ लाख ७१ हजार असे एकूण २७० कोटी २१ लाख ७१ हजार रुपयांचा नियतव्यय मंजूर आहे. यापूर्वी जून महिन्यात जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिलेल्या ४२ कोटी ७१ लाख रुपयाची कामे रद्द करून नव्याने मान्यता घेण्याचे निर्देश सत्तार यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wildlife Conservation: पाच एकर शेती वन्यजीवांसाठी राखीव

Ashadhi Wari 2026: तुकोबारायांच्या पालखीचे सात जुलैला प्रस्थान

Farm Loan Waiver: कर्जमुक्ती नव्हे, कर्जवसुली योजना

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

SCROLL FOR NEXT