Assembly Monsoon Session Agrowon
ताज्या बातम्या

Monsoon Session 2023 : निलम गोऱ्हे, मनिषा कायंदे अन् बजोरिया यांना अपात्र करा ; ठाकरे गटाची मागणी

Maharashtra Monsoon Session LIVE : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभात्याग केला. तर विधानपरिषदेमधील शिवसेनेच्या तीन आमदारांना अपात्र करावे, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली.

Team Agrowon

Maharashtra Monsoon Session 2023 Live : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. ठाकरे गटाने विधिमंडळ सचिवांना पत्र पाठवून विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, मनिषा कायंदे आणि विप्लव बजोरिया या तीन आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे.

यासंदर्भात शिवसेनेचे आमदार अनिल परब म्हणाले, `` विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या विरोधात भाजपने याआधीच अविश्वासाची नोटीस दिलेली होती. ती अजूनही कायम आहे. आता आम्ही त्यांच्या विरोधात नोटीस दिली आहे. याचा अर्थ सत्ताधारी आणि विरोधी अशा दोघांचाही उपसभापतींवर विश्वास नाही. त्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही.``

निलम गोऱ्हे यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गट त्यांच्या विरोधात आक्रमक झाला आहे.

दरम्यान, विधानपरिषदेच्या उपसभापतीसारख्या घटनात्मक पदावर असताना निलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्यामुळे त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीका होत आहे. उपसभापतीपद हे पक्षनिरपेक्ष व सर्व पक्षांना समान न्याय देणारे असणे अपेक्षित असताना गोऱ्हे या पक्षीय राजकारणाचा भाग बनल्याबदद्ल त्यांच्यावर आक्षेप घेतला जात आहे.

विधानपरिषदेत आज शोक प्रस्तावावर चर्चा सुरू असताना शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी हा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. परंतु उपसभापतींनी त्याला परवानगी नाकारली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT