Indian Science Congress Agrowon
ताज्या बातम्या

Farmers Science Congress : फार्मर्स सायन्स काँग्रेसमध्ये होणार शेती विषयावर मंथन

इंडियन सायन्स काँग्रेसअंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात गुरुवारी (ता. ५) फार्मर्स सायन्स काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे.

टीम ॲग्रोवन

नागपूर : इंडियन सायन्स काँग्रेसअंतर्गत (Indian Science Congress) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात गुरुवारी (ता. ५) फार्मर्स सायन्स काँग्रेसचे (Farmer Science Congress) आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील १५ प्रतिथयश शेतकरी आपले सादरीकरण करणार असून देशभरातील ८०० शेतकऱ्यांची या वेळी उपस्थिती राहणार आहे.

इंडियन सायन्स काँग्रेसच्या आयोजनाचा मान यंदा नागपूरला मिळाला आहे. मंगळवार (ता. ३) पासून आयोजित या सायन्स काँग्रेसचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाइन पद्धतीने करतील. पंतप्रधानांच्या आईचे निधन झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सायन्स काँग्रेसमध्ये गुरुवारी (ता. ५) फार्मर्स सायन्स काँग्रेसविषयी स्वतंत्र आयोजन केले जाईल. यामध्ये देशभरातील शेतीव्यवस्थेवर चर्चा होऊन त्यासंबंधीचा एकत्रित अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाईल.

त्या आधारे केंद्र सरकारला शेती व्यवसायाशी निगडित धोरण ठरविणे सुकर होणार आहे. फार्मर्स सायन्स काँग्रेसमध्ये सादरीकरणासाठी राज्यातील पंधरा शेतकऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

त्यामध्ये कृषिभूषण सुनील कोंडे, उद्यान पंडित ज्ञानेश्वर बनसिंगे, शेती सल्लागार गोपाल भक्ते, सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते अनिल हटेवार, फळ उत्पादक कृष्णा चाडलवाडा, रवींद्र मेटकर, मायक्रो ट्रेनिंग सेंटर संचालक चंद्रशेखर जोगेहट्टी, छाया देशमुख, सचिन चिकनकर, प्रकाश पाटील, कापूस उत्पादक भगवान रामटेके, उत्तम मते, साधना पाटील, मीनाक्षी सहारे, रेशीम उत्पादक डॉ. ए. डी. जाधव यांचा समावेश आहे.

तांत्रिक सत्रात अर्चनाकांती दास, ‘माफसू’चे संशोधन संचालक डॉ. नितीन कुरकुरे, डॉ. के. सी. नारायण स्वामी, डॉ. आदिनाथ पसलावार, सुदर्शन रेड्डी, माफसूचे विस्तार संचालक डॉ. अनिल भिकाने, हनुमंतआप्पा, कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद, पूर्णिया (बिहार) विद्यापीठ कुलगुरू डॉ. आर. एन. यादव, प्रीती सिंग, केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेचे संचालक डॉ. दिलीप घोष हे मार्गदर्शक राहतील.

फार्मर्स सायन्स काँग्रेसचे उद्‌घाटन सोहळ्याला इंडियन सायन्स काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी डॉ. अनुप कुमार जैन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, मत्स्य विज्ञान संस्था कोलकाताचे संचालक डॉ. बसंतकुमार दास, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर, पर्यावरण अभियांत्रिकी संस्था नागपूरचे संचालक डॉ. अतुल वैद्य, इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष विजय सक्सेना, फार्मर सायन्स काँग्रेसचे समन्वयक डॉ. प्रकाश ईटणकर, डॉ. एस. रामकृष्ण उपस्थित राहणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT