Satara News : ‘‘जिल्ह्याच्या पतपुरवठ्यामध्ये पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट तीन हजार ६०० कोटींचे आहे. खरीप हंगामासाठी दोन हजार ५२० कोटींचे पीक वितरणाचे उद्दिष्ट आहे. यापैकी १५ जुलैअखेर एक हजार ३९६ कोटींचे पीककर्ज वितरित करण्यात आले आहे.
बॅंकांनी दिलेल्या मुदतीत खरीप पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. ज्या बॅंकांची कामगिरी ५० टक्क्यांच्या आत असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल,’’ असा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे.
जिल्ह्यासाठी २०२३-२४ च्या पतपुरवठा आराखड्याचे लोकार्पण डुडी यांच्या हस्ते झाले. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय प्रबंधक मिलिंद होळ, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक योगेश पाटील, ‘नाबार्ड’चे प्रकल्प संचालक राजेंद्र चौधरी, आरबीआयचे प्रतिनिधी नरेंद्र कोकरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी, जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे उपस्थित होत्या.
‘‘ज्या बँकांची कामगिरी उद्दिष्टाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे, त्यांनी आपली कामगिरी उंचवावी. असमाधानकारक कामगिरी करणाऱ्या बँकांची ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा बैठक घेण्यात येईल. तोपर्यंत ज्या बॅंकांची कामगिरी ५० टक्क्यांच्या आत असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल,’’ असे डुडी म्हणाले.
कृषिपूरक उद्योगांच्या कर्ज प्रकरणांचा आढावा
खिलारी यांनी बचत गटाच्या महिलांसाठी लवकरच प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. बँका आणि बचत गटाच्या महिला यांचा संवाद घडवून आणण्यात येईल, असे सांगितले.
या बैठकीत विविध महामंडळांच्या माध्यमातून बँकांकडे सादर करण्यात आलेली कर्ज प्रकरणे कृषिपूरक व प्रक्रिया उद्योगांशी संबंधित कर्ज प्रकरणे आदींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रलंबित प्रकरणांचा बँकांनी त्वरित निपटारा करावा, अशा सूचना देण्यात आल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.