Department of Agriculture Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Department : बदली होऊनही कृषी खात्यातील अनेक जण जुन्याच पदांवर कार्यरत

Latest Agriculture News : कृषी विभागात मे महिन्यात गट ‘ब’ आणि ‘क’ संवर्गातील अनेकांच्या बदल्या झाल्या. याला आता दीड महिना लोटला तरी बरेच अधिकारी, कर्मचारी नव्या नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत.

Team Agrowon

Akola News : कृषी विभागात मे महिन्यात गट ‘ब’ आणि ‘क’ संवर्गातील अनेकांच्या बदल्या झाल्या. याला आता दीड महिना लोटला तरी बरेच अधिकारी, कर्मचारी नव्या नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत.

काहींना त्यांच्या वरिष्ठांनी कार्यमुक्त केले नसल्याचेही समोर आलेले आहे. मात्र, ही दिरंगाई बदली कायद्याचा भंग असल्याने याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने काढलेल्या पत्रात दिले आहेत.

याबाबत ७ जुलैला काढलेल्या तातडीच्या पत्रात म्हटले आहे, की सन २०२३-२०२४ मध्ये बदलीपात्र असलेल्या कर्मचा-यांच्या नियतकालिक बदल्यांचे आदेश मे महिन्याच्या अखेरीस काढण्यात आले होते.

तसेच गट ब व क (कनिष्ठ) वर्गातील अधिकाऱ्यांचा बदली आदेश शासन स्तरावरून काढण्यात आले. या आदेशासोबत बदली झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना नजीकच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे पदभार सोपवून कार्यमुक्त करण्याच्या देखील सूचना दिल्या होत्या.

बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त न केल्यास तसेच रुजू करून घेण्याची कार्यवाही तत्काळ न केल्यास संबंधित कार्यालय प्रमुखांविरुद्ध शिस्तभंग विषयक कार्यवाही प्रस्तावित करण्याबाबत सर्व संबंधित कार्यालय प्रमुखांना बदली आदेशाद्वारे निर्देश दिलेले आहेत.

तसेच बदली झालेल्या कर्मचाऱ्यांचे जून २०२३ पासूनचे वेतन कोणत्याही परिस्थितीत बदली पूर्वीच्या कार्यालयातून अदा करण्यात येऊ नये अन्यथा कार्यालय प्रमुखांना व्यक्तीशः जबाबदार धरून शिस्त भंगविषयक कारवाई करण्यात येईल व होणाऱ्या वेतनाची जबाबदारी निश्चित करीत त्याची वसुली कार्यालय प्रमुखांच्या वेतनातून करण्यात येईल असेही स्पष्ट निर्देश देण्यात आले.

तरीदेखील बहुतांश अधिकारी, कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत कार्यमुक्त करण्यात आले नसल्याची बाब समोर आलेली आहे. या अनुषंगाने बुधवारी (ता.१२) अमरावती येथे आढावा बैठक घेत तातडीने संबंधितांना कार्यमुक्तीचे निर्देश देण्यात आले.

‘कार्यमुक्त करा, अहवाल द्या’

बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करून तसा अहवाल या कार्यालयास सादर करावा, असे निर्देश कृषी सहसंचालकांनी दिले आहेत. अन्यथा शिस्तभंगविषयक कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल असा इशाराही दिला आहे. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी जबाबदार अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने वरिष्ठांकडून कामकाजाच्या हेतुने बदली झालेल्यांना सोडण्यास विलंब केल्या जात असल्याचीही वस्तुस्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update Today: कोकण, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधार; मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर

Dairy Farming: दुग्ध व्यवसायातून शाश्वत उत्पन्न शक्य : प्रा. कुलकर्णी

Swachh Wari Campaign: ‘स्वच्छ वारी’साठी संकल्प करूया : जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

Pest Outbreak: हवामान बदलामुळे वाढला विषारी सुरवंटांचा प्रादुर्भाव

Indigenous Cattle Breeding: शाश्‍वत शेतीसाठी देशी गोवंश संवर्धन

SCROLL FOR NEXT