Crop Insurance
Crop Insurance  Agrowon
ताज्या बातम्या

गेल्या वर्षीचा पीकविमा खात्यावर जमा करा

टीम ॲग्रोवन

परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजने अंतर्गत गतवर्षीच्या (२०२१) खरीप हंगामातील थकीत पीकविमा परताव्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर आठ दिवसांच्या आत जमा करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

परभणी जिल्ह्यातील मागील खरीप हंगामातील पीकविम्याची रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. राज्य व केंद्र सरकारने पीक विमा कंपनीला त्यांच्याकडील हप्त्याची रक्कम जमा केली आहे. पीक कापणी प्रयोगात जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळे उंबरठा उत्पन्नामध्ये नुकसानीत पात्र आहेत. परंतु अद्याप रिलायन्स विमा कंपनीने पीकविम्याच्या रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेल्या नाहीत.

पीकविम्याची रक्कम येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे मंगळवारी (ता. १७) जिल्ह्यात जागोजागी चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भास्कर खटिंग, मुंजाभाऊ लोडे, प्रभाकर शेरे, अनंता डुबे, गजानन तुरे आदींनी निवेदनाद्वारे दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Weekly Weather : मॉन्सूनच्या आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

SCROLL FOR NEXT