Chana Rate  Agrowon
ताज्या बातम्या

Chana Procurement : नाफेडकडून हरभरा खरेदीसाठी केंद्र सुरू करण्याची मागणी

प्रतिक्विंटल सरासरी १००० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

Team Agrowon

Akola Chana Procurement News : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या हरभऱ्याची तातडीन नाफेडमार्फत (NAFED) खरेदीसाठी केंद्र (Chana Procurement) सुरू करावेत, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांनी सहकार व पणनमंत्री अतुल सावे यांच्याकडे केली आहे.

यंत्रणेकडून अद्यापही कोणतेही खरेदी केंद्र जिल्ह्यात सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे नाइलाजास्तव शेतकऱ्यांना आपला उत्पादित केलेला हरभरा खुल्या बाजारात खासगी व्यापाऱ्यांना कमी भावात विकणे भाग पडत असल्याचेही त्यांनी लक्षात आणून दिले.

याबाबत आमदार सावरकर यांनी सावे यांना पत्र दिले असून त्यात म्हटले, की शासनाकडून हरभरऱ्यासाठी ५३३० रुपये प्रतिक्विंटल आधारभूत किंमत निश्चित केलेली असताना प्रत्यक्षात आज शेतकऱ्यांना खुल्या बाजारात ४२०० ते ४३०० रुपये प्रतिक्विंटल विकावा लागत आहे.

प्रतिक्विंटल सरासरी १००० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे शासनाने अत्यंत तातडीने हरभरा खरेदी केंद्रे सुरू करणे गरजेचे आहे. , असेही सावरकर यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT