Chandrkant Patil
Chandrkant Patil Agrowon
ताज्या बातम्या

Chandrkant Patil : गावांतील नागरी सुविधांमधील उणिवा दोन वर्षांत भरून काढणार

Team Agrowon

पुणे ः जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी (Rural Development) आवश्यक निधी देण्यात येत असून गावांतील नागरी सुविधांमधील (Civil Facility) उणिवा येत्या दोन वर्षांत भरून काढण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित ‘संकल्प २०२३-हर घर नल से जल’ कार्यशाळेच्या उद्‍घाटनप्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते.

आमदार उमा खापरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ आदी या वेळी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, की जिल्ह्यात जनसुविधेची १४५ कोटींची १ हजार ६७८ कामे मंजूर करण्यात आली असून नागरी सुविधेच्या ५६ कोटींच्या ४७० कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. गावातील रस्त्यांची कामे दर्जेदार होणे आवश्यक आहे. देशात ‘हर घर नल से जल’ योजनेवर ७० हजार कोटी रुपये खर्च होणार आहे.

योजनेअंतर्गत २०२४ पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचविण्याचे नियोजन आहे. ग्रामीण महिला खूप दूरवरून डोक्यावर हंडा ठेवून पाणी आणतात. ग्रामीण भागातील ९० टक्के आजार पाण्यामुळे होतात.

हे आजार आणि महिलांचे कष्ट दूर करण्यासाठी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. योजना सुरू करण्यासाठी आणि योजना पूर्ण झाल्यावर तिचा लाभ नागरिकांना देण्यासाठी उशीर करू नये, असे त्यांनी सांगितले.

सरपंचांना प्रशिक्षणासाठी कार्यशाळा

सरपंचांना गावात कोणती योजना आणावी याची माहिती असणे गरजेचे आहे. गावाच्या विकासासाठी सरपंचांना प्रशिक्षण देण्यासाठी तालुका पातळीवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल, असेही पालकमंत्री म्हणाले.

आयुष प्रसाद म्हणाले, की ग्रामीण भागात १ हजार ५२१ प्रकल्प राबवून १ हजार ३५४ गावांत जल जीवन मिशनअंतर्गत योजना करण्यात येत असून उर्वरित गावांत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.

जल जीवन मिशनअंतर्गत २९९ कोटींचा निधी प्राप्त झाला असून त्यातील ५० टक्के निधी राज्य व ५० टक्के केंद्राकडून प्राप्त झाला आहे, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात कर वसुलीत २५ टक्के वाढ

जिल्ह्यात तरुण सरपंचांची संख्या अधिक आहे. या सरपंचांना गावाचा विकास करण्याची चांगली संधी आहे. त्यांनी जल जीवन मिशनचे कामही चांगल्यारीतीने करावे. तसेच जनसुविधा योजनेअंतर्गत सर्व कामे ३१ मार्चपूर्वी पूर्ण करावे.

जिल्ह्यात घन कचरा व्यवस्थापनाचे सर्वाधिक काम झाले, गतवर्षी करवसुलीत २५ टक्के वाढ होऊन ३४० कोटींची कर वसुली झाली. जिल्ह्यातील ९ लाख २७ हजार घरांपैकी ८९ टक्के घरांवर महिलांचे नाव लागले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

सरपंच, अभियंत्यांचा सत्कार

‘घर घर जल' घोषित गावातील सरपंचांचा, योजनेच्या अंमलबजावणीत चांगले काम केलेल्या अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला. पाणीपुरवठा योजनांच्या कामाची गुणवत्ता, पाणी गुणवत्ता, कामांची तपासणी, गुणनियंत्रण, योजनेच्या उपांगांचे व्यवस्थापन व संनियंत्रण आदींविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : धाराशिव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

Animal Husbandry : संकटावर मात करत शोधला पशुपालनाचा मार्ग

Grain Storage : देशातील धान्य साठवणूक अन् वितरण व्यवस्था

Water shortage : जायकवाडी धरणाने वाढवली छ. संभाजी नगरकरांची चिंता; धाराशिवला टँकरचा आधार

Tomato Disease : टॉमॅटो पिकातील ‘लवकर येणारा करपा’

SCROLL FOR NEXT