Sugarcane Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Farming : उजनी शिवारात यंदा उसाच्या वजनात घट

मागील वर्षी कारखान्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे ऊस घेऊन जाण्यास खूप उशीर झाला होता. मात्र उशीर होऊनही मागील हंगामात उसाचे वजन समाधानकारक भरल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता.

Team Agrowon

उजनी जि. लातूर : मागील वर्षी कारखान्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे ऊस (Sugarcane Harvesting) घेऊन जाण्यास खूप उशीर झाला होता. मात्र उशीर होऊनही मागील हंगामात उसाचे वजन (Sugarcane Weight) समाधानकारक भरल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता.

या वर्षी मात्र मागील वर्षीच्या उलट परिस्थिती आहे. यंदा कारखान्यांनी पुरेशी यंत्रणा उभी केली आहे. मात्र उसाच्या वजनात मागील वर्षीच्या तुलनेत निम्म्याने घट झाल्याने शेतकऱ्याचे यंदा मोठे नुकसान होत आहे.

यंदा खरिपातील सोयाबीनची उत्पादकता घटली असून, एकरी केवळ चार ते पाच क्विंटल सोयाबीनचे उत्पादन मिळाले आहे. उसाच्या बाबतीतही असेच काहीसे चित्र आहे.

एकरी ५० ते ६० टन उतार मिळालेल्या क्षेत्रात केवळ २५ ते ३० टन उत्पादन होत असल्याने खर्च देखील निघत नसल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी कायम असून शेतीत तोटा होण्याची परंपरा मात्र कायम आहे.

हरभरा पिकावर ही मर रोगाचा प्रादुर्भाव

सोयाबीन, ऊस पिकाच्या उत्पादनात घट झाल्यानंतर रब्बीतील प्रमुख हरभरा पिकाच्या उत्पादनावर शेतकरी अवलंबून आहेत. परंतु यावरही मर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत असून यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

हक्काचा पीकविमा देखील मिळालेला नाही शेतकऱ्यांनी आपली पिके संरक्षित करावे जेणे करून नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळेल असे प्रत्येक वर्षी कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना सांगितले जाते.

पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने खरिपातील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तसेच उसाच्या उत्पादनावरही याचा परिणाम झाला. या वर्षी सोयाबीनचे एकरी केवळ तीन ते चार क्विंटल उत्पादन मिळाले. तसेच साडेचार एकर मध्ये गेल्या वर्षी २८६ टन ऊस झाला होता. यंदा मात्र त्या ठिकाणी १३० टन उसाचे उत्पादन मिळाले आहे. महागाईमुळे खर्चात वाढ झाली असून उत्पादनात मात्र घट झाली असल्याने मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

- प्रशांत घोंगडे, शेतकरी, उजनी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT